Mon. Dec 23rd, 2024

भोकर एस.टी. कर्मचाऱ्यांना शेख युसूफ भाईंनी दिला मदतीचा हात

Spread the love

सामाजिक जाणीवेतून केले अन्नधान्याचे किट वाटप

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : राज्य परिवहन मंडळाचे(एस.टी.चे) राज्य शासनात विलिनीकरण व्हावे यासह आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवलेले आहे.या आंदोलनास तब्बल ८४ दिवस झाले असून माघील काही महिन्यांपासून पगार ही बंद आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसिक,आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.तर अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी उपासमार ही होत आहे.या अनुषंगाने सामाजिक जान असलेल्या भोकर नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते शेख युसूफ भाई यांनी दि.१९ जानेवारी रोजी भोकर आगारातील आंदोलक गरजू कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे किट वाटप केले आहे.

राज्यातील व भोकर एस.टी.आगारातील सेवारत कर्मचा-यांनी एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी व यासह आदी मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.यास ८४ दिवस झाले आहेत.परंतु,अद्यापही न्याय मिळाला नाही.अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व अनेकांनी स्वेच्छा मरणाची परवानगी शासनाकडे मागितली आहे.तर अनेक कर्मचारी बडतर्फ ही झाले आहेत व काहीजण कौटुंबिक उपासमारीमुळे कामावर परत गेले आहेत.असे असले तरी बहुतांश कर्मचारी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पगार बंद आहे व आंदोलन काळादरम्यान ही पगार नाही.यामुळे एस.टी.कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.यामुळे मानसिक त्रासासह उपासमारीचा सामना देखील काही ए.टी. कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.या बिकट समयी त्यांना मदतीची खुपच गरज असल्यामुळे मदतीसाठी सामाजिक जाणीवेतून दानशूरांचे ‘हात’ पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.याच जाणीवेतून गेल्या काही दिवसांपुर्वी उद्योजक दिलीप उत्तरवार यांनी भोकर आगारातील कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे किट वाटप केले आहेत.तर आज दि.१९ जानेवारी २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते शेख युसूफ भाई यांनी भोकर आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी जाऊन त्यांना मानसिक आधार देत जवळपास ४० गरजू कर्मचाऱ्यांना अन्नधान्याचे किट वाटप केले आहेत. त्यांच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाबद्दल कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले असून कर्मचाऱ्यांची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी याच प्रमाणे दानशूरांचे मदतीसाठी ‘हात’ पुढे यावेत अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !