नगरपंचायतीतील काँग्रेसच्या विजयाचा भोकरमध्ये आनंदोत्सव
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अर्धापूर,नायगांव नगर पंचायतीवर बहुमत सिध्द करून माहूर नगरपंचायतीवरही काँग्रेसने लक्षणीय यश संपादन केले आहे.या अनुषंगाने भोकरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयोत्सवी आनंदोत्सव साजरा केला आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृत्वाला स्विकारून नायगाव,अर्धापूर व माहूर नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा जिल्ह्यात काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे.या विजयाचा दि.१९ जानेवारी २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी ना.अशोकराव चव्हाण आगे बढो,काँग्रेस पक्षाचा विजय असो…अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

या आनंदोत्सवात नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, काँग्रेसचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव दंडवे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सभापती जगदीश पाटील,उपसभापती गणेश राठोड, संचालक रामचंद्र मुसळे,माजी नगरसेवक मनोज गिमेकर,सुरेश पाटील डुरे,भुजंगराव पाटील भोसले, बाबुराव नागमोड,अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,गंपू पाटील,गोविंद मेटकर,विकास क्षिरसागर, आरेफ इनामदार,सय्यद खालेद,जुनेद इनामदार,आनंद पाटील चिंचाळकर,शिवा हुंडेकर,फारुख शेख,आदिनाथ चिंताकुटे,बालाजी राठोड,धनराज पाटील हसापुरकर,हणमंत तेलंगे आदीसह आदींचा सहभाग होता.