भोकर नगर परिषद राबविणार शहरात कोविड लसीकरण सर्वेक्षण मोहीम
शिक्षक व आरोग्य कर्मचा-यांचा यात राहणार आहे सहभाग
अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर नगर परिषद,शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून भोकर शहरात कोविड लसीकरण सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून शहरातील शाळेतील शिक्षक, नगर परिषद कर्मचारी व आरोग्य विभाग कर्मचारी यांच्या संयुक्त टिम वार्ड निहाय घरोघरी भेट देऊन १५ ते १८ व १८ वर्षावरील व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घेतले आहे किंवा नाही ? या बाबत सविस्तर माहिती घेणार आहेत.

त्या अनुषंगाने आज नगर परिषद भोकर येथे शिक्षक,नगर परीषद कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांची दि.१५ जानेवारी २०२२ रोजीएक बैठक घेण्यात आली.यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे, भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,भोकर पं.स.शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी डॉ.मठपती यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.तर सदरील बैठकीस अनिल सिरसाट,विस्तार अधिकारी एम.जी.वाघमारे, सत्यजीत टिप्रेसवार,पांडुरंग तम्मलवाड,जावेद ईनामदार, दत्ता अनंतवार,अशोक डोंगरे,साहेबराव मोरे,सचिन वैष्णव, रवी महाबळे,दिलीप कल्णाणकर,ज्ञानेश्वर श्रीरामवार यांसह आदी कर्मचा-यांची उपस्थिती होती.