Mon. Dec 23rd, 2024

कार अपघातात दोन पोलीस कर्मचारी ठार; तर दोन पोलीस गंभीर जखमी

Spread the love

भोकर- नांदेड महामार्गावरील खरबी ता.भोकर शिवारात झाला हा भिषण अपघात

भोकर (उत्तम बाबळे, संपादक): भोकर येथील एका पोलीस मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम करुन नांदेडकडे परत जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कार भोकर- नांदेड महामार्गावरील मौ.खरबी ता. भोकर शिवारातील रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीस माघून जोरात धडकली.या भिषण अपघातात दोन पोलीस बांधव जागीच ठार झाले असून दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस मुख्यालय नांदेड येथे नेमणूक असलेले व भोकर येथे सेवारत असलेले पो.कॉ.सुनिल सांभाळकर यांच्या घरी दि.९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी जेवणाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यांच्या निमंत्रणावरुन दिपक देवानंद जाधव ब.नं.३३७४ नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड सलंग्न कंट्रोल रुम,ईश्वर सुदाम राठोड ब.नं.२७२७ नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड,प्रितेश ईटगाळकर ब.नं.२८५३,सदानंद सपकाळ ब.नं.२३४ दोघांचीही नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड हे चारजण त्यांचा पोलीस मित्र सुनिल सांभाळकर रा.भोकर यांच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमासाठी आले होते.जेवण करुन हे चारजण इंडिका कार नंबर एम.एच.२६ व्ही.१८६८ ने भोकरहून नांदेडकडे जात असतांना रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान भोकर-नांदेड महामार्गावरील मौ.खरबी ता.भोकर शिवारात रस्त्याने जाणाऱ्या ट्रक्टर नंबर एम.एच.२६ ए.आर. ११५६ या उसाने भरलेल्या ट्रॉलीला माघून जोराने धडकली. या भिषण अपघातात कारमधील पोलीस कर्मचारी ईश्वर सुदाम राठोड व दिपक देवानंद जाधव,दोघेही नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड हे जागीच ठार झाले.तर सदानंद सपकाळ व प्रितेश ईटगाळकर दोघेही नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत.

सदरील अपघाताची माहिती मिळताच भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पो.उप.नि. सुर्यकांत कांबळे,जमादार हनवते,चालक राजेश दुथडे व आदीजण तात्काळ घटनास्थळी पोहचले.काही नागरीकाच्या मदतीने त्यानी गंभीर जखमींची अधिक उपचारार्थ नांदेडला रवानगी केली.तर उत्तरीय तपासणीसाठी मयतांचे प्रेत भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहनांच्या आजुबाजुला सुरक्षाव्यवस्था केली असून भोकर पोलीस पुढील कारवाई करीत आहोत.

🌹🙏🌹
मयत पोलीस कर्मचारी बांधवांना भावपुर्ण श्रद्धांजली!
संपादक उत्तम बाबळे आणि अंबुज प्रहार परिवार


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !