इंजि.विश्वांभर पवार यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा
वृद्धाश्रमात दिले फंखे,मिष्टान्न भोजन आणि विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्य वाटप
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष इंजि. विश्वाभंर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च न करता पक्ष कार्यकर्ते व मित्रमंडळींनी विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष,नाम फाऊंडेशनचे समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते इंजि.विश्वांभर पवार यांचा दि.३ जानेवारी २०२२ रोजी वाढदिवस होता.या मंगल औचित्याने पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व मित्रमंडळींनी नांदड,भोकर व तालुक्यात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले.यात नांदेड येथील संध्याछाया संचलित कै. रुस्तुमजी मेवावाला व कै.ताराबाई बोधूलाल जैन वृध्दाश्रमात पंखे व मिष्टान्न भोजन दिले.तसेच भोकर तालुक्यातील मोघाळी,पोमनाळा,चिंचाळा,भोकर यासह आदी गावांतील जवळपास ७०० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.याच बरोबर वृक्षारोपण ही करण्यात आल्याचा समावेश आहे.
इंजि.विश्वाभंर पवार यांचा वाढदिवस नांदेड व भोकर तालुक्यात विविध सामाजिक,लोकोपयोगी उपक्रम राबविल्याने वृध्दाश्रमातील मातृ-पितृतुल्य जेष्ठ नागरिकांनी इंजि.पवार यांना जीवनात यश,किर्ती,वैभव व निरोगी उदंड आयुष्य लाभो असा आशिर्वाद दिला.यावेळी रा.काँ.पार्टीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रमोद देशमुख कामनगावकर, वृध्दाश्रम अधिक्षक विक्रम पाटील व मित्र मंडळींची उपस्थिती होती.तर शालेय साहित्य वाटप झाल्याने विद्यार्थी व पालकांनी त्यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद पाटील सिंधीकर (रा.काँ.पा.तालुका उपाध्यक्ष),विजय पाटील पोमनाळकर,स्वामी,सिद्धू पाटील चिंचाळकर, धनराज पाटील मोगाळीकर,कैलास पाटील कोळगावकर, दत्तू पाटील सोळंके,केशव सूर्यवंशी,विठ्ठल मुतनेपवाड, बालाजी सूर्यवंशी,यांच्या सह उपरोक्त गावांतील जि.प. शाळेंचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
याच बरोबर शासकीय विश्रामगृह भोकर येथे पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व मित्रमंडळींनी केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करुन इंजि. विश्वांभर पवार यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रा.युवक काँ.पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार, तालुका कोषाध्यक्ष बालाजी पाटील गौड,रा.यु.काँ.पा.चे शहराध्यक्ष अफरोथ पठाण, छावाचे नेते शंकर पाटील बोरगावकर,यांसह बहुसंख्य मित्रमंडळींची उपस्थिती होती. अनाठायी खर्च न करता उपरोक्त सर्वांनी सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबऊन हा वाढदिवस साजरा केला आणि एक चांगला संदेश दिल्याने इंजि. विश्वांभर पवार यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत.