आज भोकर मध्ये होणार मुस्लिम-ओबीसींचा वंचितमध्ये जाहीर प्रवेश

धारजणी येथील रस्ता उद्घाटनाने वंचितची ताकद दिसणार…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जाती धर्माच्या नावावर जनतेची दिशाभूल करुन सत्तेत येणाऱ्या राजकीयांना उत्तर देण्यासाठी “जनतेच्या हक्काचे विकासाभिमुख व्यासपीठ असलेल्या”वंचित बहुजन आघाडीत” अनेकांनी प्रवेश करुन श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला असून आज भोकर येथे दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी मुस्लिम व ओबीसींच्या असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे.तसेच धारजणी ता.भोकर येथील एका प्रलंबित रस्त्याचे उद्घाटन असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याने यातून वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबीरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांनी पक्ष प्रवेश सोहळा आणि रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या सोहळ्यात अनेक मुस्लिम व ओबीसी बांधवांचा भव्य जाहीर पक्षप्रवेश होणार असून धारजणी गावातील लोकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेल्या रस्ता बांधकामाचे उद्घाटन होणार.
ज्यांनी वर्षानुवर्षे मतं घेतली पण योग्य रस्ते दिले नाहीत,नौकऱ्या दिल्या नाहीत, विकास कामातील हक्काचा निधीही लुटला,आता त्यांना जनता नकार देत आहे.या पक्षप्रवेशातून नाराज जनता वंचित बहुजन आघाडीकडे वळत आहे.तर धारजणीचा हा रस्ता वंचितने जनतेला दिलेली पहिली हमी आणि पहिली पूर्तता आहे. म्हणून जनतेने खोट्या आश्वासनांना बळी न पडता वंचित सोबत यावे,असे आवाहन तालुकाध्यक्ष दिलीप राव यांनी केले आहे.तर भोकर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सदरील दोन्ही कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहून वंचितची खरी पर्यायीशक्ती दाखवून द्यावी,असे आवाहन महासचिव शिवाजी जम्पलवाड यांनी केले आहे.