‘हर घर तिरंगा’ अभियानासह भोकर महसूल प्रशासनाने राबविली स्वच्छता मोहीम

उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : देश व राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे.याच अनुषंगाने दि.८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर तिरंगा आणि हर घर स्वच्छता’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर महसूल प्रशासन आणि भोकर नगर परिषदेच्या वतीने दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदरील स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय व परिसरातील सखोल भागातील स्वच्छतेने करण्यात आला आणि बसस्थानकातील स्वच्छतेने या मोहिमेचा समारोप करण्यात आला.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,तहसिलदार विनोद गुंडमवार,नायब तहसिलदार उमर शेख,नायब तहसीलदार काशिनाथ डांगे,नायब तहसीलदार प्रशांत कावरे,कार्यालयीन लिपिक विशाल चौधरी, मंडळ अधिकारी एम.ए.खंदारे,तलाठी अनिल मुनेश्र्वर,लिपिक दिलीप कावळे,कोतवाल राहुल कदम,योगेश गोरठकर,गंगाधर शेळके,प्रसाद गिरी,यांसह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारीभोकर नगर परिषदेतील कार्यालय अधीक्षक जावेद इनामदार,इंजि. खिल्लारे,रवी महाबळे,सुनिल कल्याणकर,त्रिरत्न कावळे,साहेबराव मोरे,अशोक डोंगरे,आरपल्ले,दिलीप वाघमारे, माधव बोधगिरे,यांसह कार्यालयीन कर्मचारी,अग्निशमन दल कर्मचारी,वसुली विभाग कर्मचारी, स्वच्छता विभाग कर्मचारी आणि प्रकारचे तालुकाध्यक्ष ॲड.शेखर कुंटे,स्वच्छता दुत ग.ई.कांबळे, एस.टी.महामंडळाचे श्रीदत्त चाटलावार,परशूराम साखरे,रविंद्र पाटील,शेख मुबिन मैनोद्दीन,संभाजी भालेराव यांसह आदींनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी घेतला होता.तर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याने सर्व सहभागींनीही उत्स्फूर्तपणे परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.