जप्त केलेल्या व बेवारस दुचाकींचे मुळ कागदपत्रे दाखवून ती वाहने घेऊन जावेत-पो.नि.अजित कुंभार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रांतर्गत अपघात झालेल्या, बेवारस सापडलेल्या व वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलीसांनी जप्त केलेल्या दुचाकी गेल्या काही वर्षांपासून भोकर पोलीसांत जमा आहेत.लवकरच त्या दुचाकींचा लिलाव करण्यात येणार आहे.तरी त्या दुचाकी ज्यांच्या असतील त्यांनी संबंधित मुळ कागदपत्रे दाखवून घेऊन जाव्यात,असे आवाहन भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.अजित कुंभार यांनी केले आहे.
भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रांतर्गत शहर व ग्रामीण भागात झालेल्या अपघातातील,बेवारस सापडलेल्या व चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या काही दुचाकी आणि अन्य वाहने गेल्या काही वर्षांपासून जमा आहेत. अद्यापही ओळख पटवून ती वाहने मुळ मालकांनी नेलेली नाहीत.सदरील वाहने भोकर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात असून संबंधितांनी पहावेत व मुळ कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवून घेऊन जावेत.हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ओळख पटवून ते वाहने घेऊन जाण्यासाठी मुळ मालक आले नाही तर संबंधित वाहनांवर कोणाचाही मालकी हक्क राहणार नाही,असे समजून त्या वाहनांची लवकरच कायदेशीर लिलाव प्रक्रिया करण्यात येणार येईल.बऱ्याच दिवसापासून बेवारस स्थितीत पडून असलेल्या त्या वाहनांची यादी भोकर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आलेली असून सदरील वाहनांच्या मालकी हक्का बाबतचे सर्व कागदपत्र दाखवून वाहन मालकांनी ती वाहने घेऊन जावेत,असे आवाहन पो.नि.अजित कुंभार यांनी केले आहे.