भोकर चे भूमिपुत्र नंदकुमार दिगंबरराव बिंदू अनंतात विलीन…!
भोकर चे पहिले मंत्री जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिगंबरराव बिंदू यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होत
अंबुज प्रहार प्रतिनिधी
हैदराबाद : भोकर चे भूमिपुत्र निजाम राज्याचे पहिले मंत्री, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिगंबरराव बिंदू यांचे कनिष्ठ चिरंजीव इंजि.नंदकुमार दिगंबरराव बिंदू(८१) यांचे दि. १२ जानेवारी २०२५ रोजी पहाटे हैद्राबाद(तेलंगणा राज्य) येथील राहते घरी योगा करतांना अचानकपणे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दि.१३ जानेवारी २०२५ रोजी हैदराबाद येथील हिंदू दहनभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोकर चे भूमिपुत्र व पहिले मंत्री तथा जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिगंबरराव बिंदू यांचे कनिष्ठ चिरंजीव इंजि.नंदकुमार दिगंबरराव बिंदू यांचा जन्म दि.१३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हैदराबाद (तेलंगणा राज्य)येथील विवेक वर्धिनी विद्यालयात झाले.तर इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अभियांत्रिकी(B.E.) चे शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालय,छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे झाले. त्यांनी प्रथम अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात(M.S.E.B.)महाराष्ट्रात नौकरी केली व नंतर ती नौकरी सोडून ज्योती इलेक्ट्रिकल,देवापूर(तेलंगणा राज्य) येथिल ओरिएंटल सिमेंट कंपनीत मुख्य महाव्यवस्थापक म्हणून (Orient Cement company Chief General Manager) म्हणून नौकरी केली आणि याच ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले.अतिशय मनमिळाऊ,शांत,संयमी,अत्यंत तल्लख बुद्धीमत्ता असलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्व परिचित होते.बिंदू परिवाराचे ते मोठे आधारस्तंभ होते व सुभाषराव बिंदू यांचे ते काका होत.
स्व.नंदकुमार बिंदू यांच्या पश्चात मुलगा,सून,विवाहित मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे चिरंजीव सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गोल्ड मन सॅक कंपनी हैदराबाद येथे मॅनेजिंग डायरेक्टर (M.D.)पदावर सेवारत आहेत.तर मुलगी ही अमेरिकेत एका नामांकित कंपनीत उच्च पदावर सेवारत आहे.त्यांच्या पार्थिवावर दि.१३ जानेवारी २०२५ रोजी हैदराबाद येथील हिंदू दहनभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बिंदू कुटूंबातील सर्व सदस्य,नातेवाईक व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.बिंदू परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी असून संपादक उत्तम बाबळे व परिवाराची स्व.नंदकुमार बिंदू यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!