माजी सभापती किशोर केसराळे यांचे दु:खद निधन
भोकर बाजार समितीचे संचालक उज्वल केसराळे यांना पितृशोक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील बहुपदस्थ व एक निस्वार्थ व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित असलेले स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे माजी सभापती किशोर भुजंगराव केसराळे(७४) हे गेल्या एक महिन्यापासून आजारी होते.नांदेड येथील राहत्या घरी दि.७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८:४५ वाजता उपचारा दरम्यान त्यांचे अल्पशा: आजाराने दु:खद निधन झाले आहे.
मौ.सोनारी ता.भोकर येथील रहिवासी असलेले किशोर भुजंगराव केसराळे यांनी जवळपास ३० वर्ष मौ.सोनारी ग्रामपंचायतीचे सरपंच पद भुषविले आहे.राणी लक्ष्मीबाई शिक्षण प्रसारक मंडळ सेवाभावी संस्था भोकर चे ते पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत.तर दि.२१ जुलै १९८९ ते दि.२३ ऑक्टोबर १९९२ पर्यंत स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे त्यांनी सभापती पद भुषविले आहे. याचबरोबर नांदेड जिल्हा सहकारी मजूर संस्थेचे ते चेअरमन होते.तसेच सन १९९० मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७२-भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,उपक्ष उमेदवार किशोर भुजंगराव केसराळे व शिवसेनेच उमेदवार डॉ.उत्तम लच्छमा जाधव यांच्यात तिरंगी लढत झाली असता त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आणि अवघ्या २०६४ मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता.एक बहुपदस्थ,निष्कलंक, स्वच्छ प्रतिमेचे, सुसंकृत,शांत,संयमी,मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची नांदेड जिल्ह्यात ख्याती आहे.स्व.किशोर केसराळे हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका व राणी लक्ष्मीबाई शिक्षण प्रसारक मंडळ सेवाभावी संस्था व भोकर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या अध्यक्षा श्रीमती गंगादेवी केसराळे यांचे पती आणि स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक तथा सरपंच उज्वल केसराळे यांचे वडील होत.
स्व.किशोर केसराळे यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, सून,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.दि.८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता गावी मौ. सोनारी ता.भोकर येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केसराळे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी असून स्व. किशोर केसराळे यांना संपादक उत्तम बाबळे व परिवाराची भावपुर्ण श्रद्धांजली!