Thu. Jan 9th, 2025

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष तथा दैनिक सत्यप्रभाचे संपादक संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात आली असून दि.३१ डिसेंबर २०२६ पर्यत त्यांची सदरील पदासाठी मुदत राहणार आहे. मराठी पत्रकार परिषदेने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे नुकतीच ही घोषणा केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हा अध्यक्ष होतो.त्या नियमानुसार संतोष पांडागळे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.संतोष पांडागळे हे गेली चार वर्षे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. परिषदेचे निरिक्षक तथा सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी दोन वेळा नांदेडला भेट देऊन सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच सदस्यांशी चर्चा केली व चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे.संतोष पांडागळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन परिषदेशी विचारविनिमय करून आपली कार्यकारिणी तयार करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.मावळते जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि त्यांच्या टीमने त्यांच्या मागील कार्यकाळात नांदेड जिल्हयात उल्लेखनीय कार्य करून परिषदेची चळवळ अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेने गोवर्धन बियाणी आणि टीमचे कौतूक केले आहे.संतोष पांडागळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे,अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,कार्याध्यक्ष शिवराज काटकर,सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे,चिटणीस सचिन शिवशेट्टे,रवी उबाळे यांसह आदींनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !