३ जानेवारीला श्री साईबाबा प्रतिष्ठान भोकर च्या वतीने सावित्रीमाईंच्या कर्तुत्ववान लेकींचा होणार सन्मान
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे पुरस्कार वितरण सोहळा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांच्या वाढदिवसा निमित्त दि.३ जानेवारी रोजी श्री साईबाबा प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रात अमुल्य योगदान दिलेल्या सावित्रीमाईंच्या कर्तुत्ववान लेकींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच नांदेड लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार प्रा.रविंद्र चव्हाण व पत्रकार बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून सदरील सन्मान सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठान च्या विश्वस्तांनी केले आहे.
अस्पृश्य,शोषित,वंचित,उपेक्षित व महिलांच्या शिक्षणासाठी थोर समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले या दांपत्याचे शिक्षण क्षेत्रात अमुल्य योगदान आहे.माता सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांचा वाढदिवस दि.३ जानेवारी रोजी आहे. या औचित्याने श्री साईबाबा प्रतिष्ठान भोकर च्या वतीने शुक्रवार,दि.३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता कै.बाबागौड पाटील प्राथमिक शाळा व कै. भगिरथीबाई माध्यमिक विद्यालय भोकर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भुषण पुरस्कार-२०२५ वितरण आणि खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम हे राहणार असून प्रमुख पाहुणे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, काँग्रेसचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,काँग्रेसचे नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार,तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा सौ.रेखा चव्हाण,सुरेश दादा गायकवाड,काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे, जि.प.माजी सभापती तथा जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती शिरीष देशमुख गोठेकर, श्री साईबाबा प्रतिष्ठान चे अध्यक्ष माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर, महंत प्रभाकरबाबा कपाटे महाराज,शिवसेनेचे(उबाठा) जिल्हा प्रमुख बबनराव बारस,सुभाष पाटील कोळगावकर,मुबीन खॉन इनामदार,शहराध्यक्ष तौसिफ इनामदार यांसह विविध क्षेत्रातील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भुषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात येऊन सन्मान करण्यात येणार आहे.क्रांतिज्योती सावित्रीमाई च्या सन्मानित होणाऱ्या त्या लेकी पुढील प्रमाणे आहेत.महंत अरुणा प्रभाकर कपाटे,शेषाबाई चंदर बंबलवाड,सौ. सुमनबाई लक्ष्मणराव हिरे,साबेरा बेगम मियां इनामदार, रुक्मिणीबाई विठ्ठलराव शिलेमाने,भारतीबाई दिलीप राव, आनंदाबाई दत्तात्रय घोडेकर,जिजाबाई संतुकराव चारलेवाड, श्रीमती निर्मलाताई खडतकर,श्रीमती उमादेवी गुरुप्रसाद तिवारी,श्रीमती भागनबाई लक्ष्मण वर्षेवार,डॉ.ऐश्वर्या अमृता कदम,भारतबाई बाबुराव राठोड,सौ.श्रीदेवी संतोष मारकवार, शिवकांता प्रणव पडोळे,कु.पार्वती प्रेमसिंग चव्हाण,राणी तिरुपती जाधव,यांचा उपरोक्त पुरस्काराने सन्मान होणार आहे.
याचबरोबर पत्रकार बांधवांचा ही सत्कार करण्यात येणार असून होऊ घातलेल्या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कै.बाबागौड पाटील प्राथमिक शाळा व भागीरतीबाई माध्यमिक विद्यालय भोकर चे मुख्याध्याधक नरेश पाकलवार,कै.शंकरराव चव्हाण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवाशी आश्रम शाळा दिवशी(बु.) चे मुख्याध्याक विलास रोडगे यांनी केले आहे.