Wed. Dec 25th, 2024

स्वातंत्र्य सेनानी मातोश्री श्रीमती शांताबाई देशमुख कामनगावकर यांचे वृद्धापकाळी दु:खद निधन

Spread the love

प्राचार्य संजय सावंत देशमुख कामनगावकर यांना मातृशोक…

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.कामनगाव येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रीमती शांताबाई माणिकराव सावंत देशमुख कामनगावकर यांचे दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
स्वा.से.स्व.मातोश्री शांताबाई देशमुख कामनगावकर यांच्या पार्थिवावर दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०५ वाजता मौ.कामनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत देशमुख कामनगावकर यांच्या त्या मातोश्री असून मातोश्रींच्या पश्चात चार मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सावंत देशमुख परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी असून संपादक उत्तम बाबळे व परिवाराची स्व.मातोश्रींना भावपुर्ण श्रद्धांजली!

 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !