Wed. Dec 18th, 2024

सप्तशृंगी येथे तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय समन्वय सभेचे आयोजन

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची रविवार,दि.२२ डिसेंबर रोजी २०२४ रोजी श्री क्षेत्र सप्तशृंगी गड,कळवण,जि.नाशिक येथे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली असून सदरील बैठकीस राज्यसचिव हरिश्चंद्र काळे महेंद्र निकम, नारायण पवार,सभेस मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रविवार,दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र सप्तशृंगी गड ता.कळवण,जिल्हा नाशिक येथे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली असून सदरील बैठकीस राज्यसचिव हरिश्चंद्र काळे (अहिल्यानगर),मधुकर मुंगल (नांदेड),महेंद्र निकम(छत्रपती संभाजी नगर),नारायण पवार(सातारा) यासह आदी राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.याच बरोबर राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी,विभागीय अध्यक्ष,सचिव, जिल्हाध्यक्ष,जिल्हा सचिव व पदाधिकारी,तसेच राज्यातील सक्रिय सभासद बांधव सभेस उपस्थित राहून चर्चेत सहभाग होणार आहेत.तसेच या बैठकीत राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबीत विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यास्तव चर्चा होणार आहे.

संघटनेच्या मागणीनुसार राज्य शासनाने दि.२४ सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी केले आहे.या निर्णयामुळे संवर्गाच्या वेतनत्रुटी दूर करण्याच्या मार्गातील एक टप्पा सोडविल्याबद्दल राज्य शासनाच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात येणार आहे.तसेच ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास सातव्या वेतन आयोगानुसार दि.१ जानेवारी २०१६ पासून काल्पनिक वेतन लागू करून वेतन निश्चितीत एकसमानता येण्याकरिता शुद्धिपत्रक निर्गमित करण्याबाबतच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन नवीन पदनामाप्रमाणे संघटनेच्या नावात बदल करून संघटणेची घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत अधिकारी संवर्गावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित अहवालचा पाठपुरावा करून शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी प्रयत्न करुन दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल,तसेच पुढील वर्षी होणाऱ्या संघटनेच्या कार्यकारिणी विषयी सन २०२५ ते २०३० दरम्यानच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिये बाबत चर्चा करण्यात येणार आहे.

याचबरोबर संवर्गात दि.१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्यास्तव निर्णय घ्यावयाचा आहे.‌ संघटनेची घटना व ध्येय धोरणे यांचा आढावा घेऊन सभासद नोंदणी व व्याप्ती वाढविण्यासाठी उपाय योजना ठरवायच्या आहेत.राज्य व विभागीय कार्यकारिणीतील रिक्त पदे भरुन हंगामी जिल्हा कार्यकारणीस मान्यता द्यायची आहे.तसेच नवीन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सन्मान करून जबाबदारी देण्याचा निर्णय ही या बैठकीत घ्यायचा आहे.तसेच संवर्गातील पदोन्नती व विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांचा संघटणेच्या वतीने सत्कार करणे,संघटनेचे पुढील ध्येय धोरणे गतिमान करणे,व्याप्ती व कामाची दिशा या विषयावर बैठकित चर्चा करुन पुढील निर्णय घ्यायचा आहे.अशी माहिती नांदेड जिल्हाध्यक्ष गुलाबराव वडजे पाटील व जिल्हा सचिव संजय देशमुख यांनी दिली आहे.या बैठकिसाठी संघटनेचे पदाधिकारी व सक्रिय सभासद बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक अनुप श्रीवास्तव,विभागीय उपाध्यक्ष सुनील पारडे,विठ्ठल सुर्यवंशी,के. डी.सुर्यवंशी,नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष संदिप कच्छवे,कोषाध्यक्ष बालाजी पंतोजी,उपाध्यक्ष मोहन राहुलवाड,प्रशांत कोकाटे, प्रभाकर सोगे,श्रीमती शोभा पारसेवार,अरुण चौधरी,माधव ढगे,भास्कर कापसे,जगन्नाथ लकडे,बालाजी कनोजवार, नारायण काळे,शिंदे,यांसह नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे व सरचिटणीस माया मोढे,विनोद अहिरे,संजय बाविस्कर यांसह आदींनी केले आहे.

याच बरोबर संपादक उत्तम कांबळे यांसह राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेणार आहेत.या बैठकीत राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या मंत्रालयीन स्तरावर प्रलंबीत विविध मागण्यांचा पाठपुरावा करणे,ग्रामपंचायत अधिकारी संवगांस सातव्या वेतन आयोगानुसार दि.१ जानेवारी २०१६ पासून काल्पनिक वेतन लागू करून वेतन निश्चितीत एकसमानता येण्याकरिता करिता शुद्धिपत्रक निर्गमित करण्याबाबत मागणीचा पाठपुरावा करणे,संवर्गास जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करणे यांसह संघटनेचे पुढील ध्येय धोरणे, गतिमानता,व्याप्ती व कामाची दिशा या विषयावर बैठकित निर्णय घेण्यात येणार आहेत अशी माहिती राज्य प्रतिनिधी शिवकुमार देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे दिली आहे. राज्यस्तरीय बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे व सरचिटणीस माया मोढे,विनोद अहिरे,संजय बाविस्कर यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !