परभणी घटनेतील ॲड.सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी पुकारलेल्या बंदला भोकर मध्ये अभुतपुर्व प्रतिसाद
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : परभणी येथील संविधान शिल्प विटंबनेनंतर पोलीसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अटक करुन न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठविण्यात आलेल्या ॲड. सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब तमाम संविधान प्रेमींच्या भावना दुखविणारी असल्याने सदरील घटनेच्या निषेधार्थ व मयतास न्याय मिळावा यासाठी विविध आंबेडकरी संघटना,पक्ष व विचार अनुयायींनी दि.१६ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भोकर बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला असून सकाळ ते रात्रीपर्यंत शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
परभणी येथील विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक संविधान शिल्पाची विटंबना झाल्या नंतर विविध आंबेडकरी संघटना,पक्ष व विचार अनुयायींच्या सबंध राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.परभणी शहरात सदरील घटनेच्या निषेधार्थ तीव्र निषेध आंदोलन केले गेले.कायदा,शांतता व सुरक्षेच्या नावाखाली परभणी शहरात पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन केले आणि अनेक भिमसैनिकांना अटक करुन बेदम मारहाण केली.तसेच त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे नोंदवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.याच दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.सोमनाथ सुर्यवंशी या निष्पाप उच्चशिक्षित तरुणाचा मारहाणीतील गंभीर दुखापतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी,पीडीत सुर्यवंशी कुटूंबियांना ५० लाख रुपयाची मदत देऊन कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरी द्यावी यासह आदी मागण्यांसाठी व दुर्दैवी मृत्यूच्या निषेधार्थ घटनेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार अनुयायी,विविध आंबेडकरी संघटना,पक्ष,सामाजिक कार्यकर्ते यांसह आदींनी दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी भोकर बंदचे आवाहन केले होते.या आवाहनास भोकर शहरातील सुज्ञ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे हा बंद अभुतपूर्व यशस्वी झाला.शहरातील बाजारपेठ ११ टक्के बंद ठेवण्यात आली.शाळा, महाविद्यालय व विशेषतः न्यायालयीन कामकाज बंद ठेऊन वकील मंडळी ही या बंदमध्ये सहभागी झाली.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी मयत ॲड.सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली व त्यानंतर शहरातील विविध जाती धर्मातील संविधान प्रेमी नागरिकांचा भव्य समुह तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात धडकला आणि त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली.यावेळी निषेधपर भावना व्यक्त करण्यास्तव झालेल्या सभेचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे यांनी केले.तर संपादक उत्तम बाबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील,माजी सभापती नागनाथ घिसेवाड,वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राव,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव अमृतवाड,रमेश गायकवाड,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार,बाबा खान पठाण,सामाजिक कार्यकर्त्या सुलोचनाताई ढोले,भीमराव दुधारे,भीम टायगर सेनेचे प्रतिक कदम,देवा हटकर यांसह आदींनी निषेधपर मनोगत व्यक्त केले.यानंतर तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोक्त मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.सभेचे सुत्रसंचालन मिलींद गायकवाड यांनी केले,तर आभार देवा हटकर यांनी मानले.
या निषेधपीठावरील उपस्थितांत व बंद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष तौसिफ इनामदार, जयभीम पाटील,सुनील कांबळे,बी.आर.पांचाळ,संदिप पाटील गौड,एम.आय.एम.चे जुनेद पटेल,आनंदीबाई चुनगुरवाड,सुरेखा माळे,सुरेखा गजभारे,गायकवाड बाई,मनोज गिमेकर,नामदेव वाघमारे,दत्ता डोंगरे,विक्रम क्षिरसागर,सतीश जाधव,पॅंथरचे असित सोनुले,निखिल हंकारे,संदीप गायकवाड,भीमराव हनवते,संजय जळपतराव,दिलीप पोतरे,केरबाजी देवकांबळे, शिवाजी गायकवाड,प्रसाद शहाणे,पत्रकार सिद्धार्थ जाधव,शेख लतीफ,संभाजी कदम,गजानन गाडेकर,आर.के.कदम,शंकर कदम,रमेश गंगासागरे,दिलीप सोनवणे,माणिक जाधव,राहुल सोनकांबळे,कांतीलाल जोंधळे यांसह असंख्य भिमसैनिकांचा समावेश होता.तर कायदा,शांतता व सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि.शैलेंद्र औटे,महिला सहाय्यक पो.नि.कल्पना राठोड,पो. उप.नि.राम कराड,पो.उप.नि.सुरेश जाधव,सहा.पो.उप.नि. प्रल्हाद बाचेवाड, संभाजी देवकांबळे,जमादार नामदेव जाधव, सोनाजी कानगुले,पो.कॉ.प्रमोद जोंधळे,गोपनीय शाखेचे पो.कॉ.परमेश्वर गाडेकर यांसह आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.