Thu. Dec 19th, 2024

बांगलादेशातील हिंदूंवरील अनन्य अत्याचाराच्या निषेधार्थ भोकर मध्ये मुक मोर्चा व बंदला उदंड प्रतिसाद

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अनन्य अत्याचार हे माणूसकीला काळीमा फासणारे व निषेधाहर्य आहेत.सदरील अमानवी कृत्य तात्काळ थांबवून अल्पसंख्याक हिंदू व मठ,मंदीरांचे संरक्षण करण्यात यावे, या मागणीसाठी व त्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ भोकर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मुक मोर्चाला आणि बंदला उदंड प्रतिसाद मिळाला असून उपरोक्त मागण्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाजासह साधू,संत,महंत,मठ मंदिरांवर मुस्लिम कट्टरवाद्याकडून प्रचंड हल्ले होत आहेत.तसेच दिवसाढवळ्या महिलांवर अनन्य अत्याचार होत आहेत.हे अमानुष अत्याचार थांबवावेत व पीडितांचे संरक्षण व्हावे यासाठी लोकशाही मार्गाने उठवलेला आवाज तेथील मुस्लिम कट्टरवाद्याकडून हुकूमशाहीने दाबला जात आहे.याच अनुषंगाने होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या इस्कॉन साधू चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.होत असलेल्या या सर्व गंभीर बाबीकडे भारत सरकार व जागतिक शांतता परिषदेने तात्काळ लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी व होत असलेल्या अनन्य अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदूंच्या वतीने दि.१० डिसेंबर २०२४ रोजी भोकर येथे मुक मोर्चाचे आणि शहर बंद चे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०:०० वाजता श्री बालाजी मंदिर नवा मोंढा भोकर येथून काढण्यात आलेल्या या मुक मोर्चात महंत बालयोगी व्यंकट स्वामी महाराज(पिंपळगाव मठ संस्थान),चैतन्य बापू महाराज (कोंडल्य ऋषी आश्रम, कोंडदेवनगर),साध्वी मुक्ताईनाथ दीदी(आश्रम टाकराळा),महंत प्रभाकर कपाटे महाराज(श्रीकृष्ण मंदिर संस्थान,भोकर),उत्तम बन महाराज(कैलास गड,भोकर),चंद्रकांत जोशी महाराज व रवी जोशी महाराज(राम मंदिर संस्थान,भोकर),निर्मला ताई (तुकडोजी महाराज आश्रम,जामदरी),विठ्ठल महाराज(शनी मंदिर,भोकर) बापूराव पाटील सोनारीकर(संत तुकडोजी महाराज संस्थान भोकर),सतीश शहाणे भोकर व अनेक साधू संत,महंत यांसह महिला,पुरुष,तरुण आणि आपली दुकाने, प्रतिष्ठाणे बंद ठेवून व्यापारी सहभागी झाले होते.
भोकर शहरातील मुख्य रस्त्याने निघालेल्या सदरील मुक मोर्चाची तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सांगता करण्यात येऊन सभेत रुपांतर करण्यात आले.सभेच्या मंचावर उपरोक्त साधू,संत,महंत,साध्वी व आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुक मोर्चा व भोकरे शहर बंद विषयीची पार्श्वभूमी प्रा. डॉ.व्यंकट माने यांनी प्रास्ताविकातून मांडली व देण्यात देणाऱ्या निवेदनाचे वाचन केले.तर महंत प्रभाकर कपाटे,महंत बालयोगी व्यंकट स्वामी महाराज,साध्वी मुक्ताईनाथ दीदी यांसह आदींनी सकल हिंदूंनी महिला संरक्षण,देश संरक्षण व आत्मसंरक्षणासाठी एकजूटीने लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रखड मनोगत व्यक्त केले.यानंतर बांगलादेशातील होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधाचे व विविध मागण्यांसंदर्भीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणारे निवेदन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते तहसिलदार विनोद गुंडमवार यांना देण्यात आले.याच बरोबर भोकर शहरातील अतिक्रमणे हटविण्यात यावेत व भोकर येथील ऐतिहासिक यादव कालीन शिवमंदिर तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष नष्ट करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येऊन तो ऐतिहासिक वारसा पुनश्च उभारण्यात यावा,असे अन्य दोन निवेदन ही देण्यात आले असून त्या निवेदनांवर प्रा.डॉ.व्यंकट माने,साईदास माळवंतकर, संजय सोनाळे,योगेश देशपांडे भोकरकर,आडेलू ताटीकोंडलवर,अमित ऱ्याकावर,पांडुरंग थळंगे,आकाश गंटेवार,बालाजी घिसेवाड,महेश चिंचबनकर,महेश दिवसरकर, शिवदास चिंताकुटे,प्रतिक शेठ,गिरीष लक्षटवार,निखिल शिंगेवार,महेश गंदेवार,आकाश टाक,आकाश देशपांडे,किशू मुदिराज,प्रकाश मुदिराज यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरील मुक मोर्चा व शहर बंद च्या यशस्वीतेसाठी उपरोक्तांसह सकल हिंदू बांधवांनी परिश्रम घेतले व व्यापारी आणि प्रतिष्ठांनी आपली दुकाने बंद ठेऊन स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !