Fri. Dec 20th, 2024

भोकर तालुक्यात ४४०० हेक्टरवर हरभरा,तर ३५०० हेक्टरवर झाली गव्हाची पेरणी

Spread the love

यंदाच्या ९२९०.६० हेक्टरवरील एकूण रब्बी पेरणीत शेतकऱ्यांनी दिली गव्हाला दुय्यम पसंती ; रब्बी पिकांवर अळी व रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर कृषि तज्ञांचा सल्ला घेऊन फवारणी करावी -दिलीप जाधव

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील रब्बी पीक पेरणीचे सरासरी प्रस्तावित क्षेत्र ७ हजार ६०६ हेक्टर असले तरी हे सरासरी क्षेत्र ओलांडून ९ हजार २९०.६० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असून यात ४ हजार ४०० हेक्टर हरभरा आणि ३ हजार ५०० हेक्टरवर गहू पेरणी झाल्याचा समावेश आहे.ही आकडेवारी अंतिम नसून डिसेंबर २०२४ महिन्या अखेर एकूण क्षेत्र ठरणार असून आतापर्यंत झालेल्या पेरणीत शेतकऱ्यांनी गहू पेरणीला दुय्यम पसंती दिली असल्याचे निदर्शनास येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगाम पीक पेरणीच्या सरासरी प्रस्तावित क्षेत्रात डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ लाख २८ हजार ८८७ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा करण्यात आला आहे.तर त्यापाठोपाठ १७ हजार ४५७ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली असून गहू पेरणीस दुय्यम पसंती दिली आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीसाठी ३२ हजार ६९९ हेक्टर क्षेत्र प्रास्तावित करण्यात आले असून त्यापैकी १७ हजार ४५७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.त्याची टक्केवारी ५३.३९ इतकी आहे.तर गव्हासाठी २९ हजार ७१३ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून १५ हजार ७३० हेक्टरवर म्हणजे ५२.९४ टक्के गव्हाची पेरणी झालेली आहे.तर हरभऱ्यासाठी १ लाख ५३ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून त्यापैकी सव्वा लाखपेक्षा अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे.हे क्षेत्र पुर्ण नसून डिसेंबर अखेर यात पेरणी क्षेत्राची वाढ होऊ शकते.तसेच भोकर तालुक्यातील रब्बी हंगाम पीक पेरणीचे प्रस्तावित क्षेत्र ७६०६ हेक्टर असून हे सरासरी प्रस्तावित क्षेत्र ओलांडून ९ हजार २९०.६० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.यात हरभरा पिकाचे प्रस्तावित सरासरी क्षेत्र ३ हजार ७९६ हेक्टर असले तरी ४ हजार ४०० हेक्टरवर आणि गहू पिकाचे प्रस्तावित सरासरी क्षेत्र १ हजार ९७४ हेक्टर असून ३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.तर अन्य पिकांची झालेली पेरणी व कंसात सरासरी क्षेत्र पुढील प्रमाणे आहे.रब्बी ज्वारी ३३५ हेक्टर(१,४५२),मका ५५ हेक्टर(३०५),इतर तृणधान्य ५ हेक्टर(५५),करडई १५ हेक्टर(१२),एकूण तृणधान्य ३ हजार ८९५ हेक्टर(३,७८६) आणि एकूण ४ हजार ४१५ हेक्टर( ३,८०८),भुईमूग ० हेक्टर, तिळ ० हेक्टर(४),कारळ ० हेक्टर(०),सुर्यफुल ० हेक्टर(५),इतर गळीत धान्य ० हेक्टर(०), एकूण ० हेक्टर(५),सुरु ऊस २८५ हेक्टर,केळी ३५० हेक्टर,मिरची ५ हेक्टर,भाजीपाला २९०.८० हेक्टर,कांदा ७९.८० हेक्टर अशी पेरणी झाली आहे.

रब्बी पिकांवर अळी व रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर कृषि तज्ञांचा सल्ला घेऊन फवारणी करावी – कृषि अधिकारी दिलीप जाधव

रब्बी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला चांगली थंडी पडली होती. नंतर त्यात बदल होऊन ढगाळ वातावरण व दिवसा उकाडा होत असून रात्रीला थंडीचे प्रमाण घटले होते.सद्या ही म्हणावी तशी पोषक थंडी नसून हरभरा पिकावर आळी व रोग पडण्याची शक्यता असल्याचे जाणकारांतून बोलल्या जात आहे.तर राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून त्यामुळे वाढत्या थंडीचा गहू,हरभरा ज्वारी या पिकांसाठी फायदा होणार आहे.पोषक वातावरणा अभावी हरभरा पिकांवर जर अळी व का अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर कषि तज्ञांचा व कृषि अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांनी सल्ला घ्यावा.निंबोळी अर्का सोबत प्रॉब्लेम, मिसाईल फवारणी,मर दिसली तर बुरशीनाशकाची फवारणी करावी,तसेच शेवटच्या टप्प्यात फ्लूमेंडामाईन टाकू मीनिली फ्लोअर पोल, क्लोराजीन,इमे मॅक्टीन ची मात्रा टाकून १० लिटर पाणी मिश्रणा सोबत फवारणी करावी,याचबरोबर नियमित सर्वेक्षण करावे व आळी दिसल्यास कामगंध सापळे लावावेत आणि आमवस्येच्या मागेपुढे वरील औषधी वापरुन आलटून पालटून फवारणी केल्यास रोगांवर आळा घालता येईल अशी माहिती भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !