Fri. Dec 20th, 2024

जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने ५ दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमाला संपन्न

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : जगभरातील संस्कृती आणि वारसाचे संवर्धन करण्यासाठी दि.१९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो.या जागतिक वारसा सप्ताहच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,मुंबई तसेच सहाय्यक संचालक (पुरातत्त्व) छत्रपती संभाजीनगर विभाग,भारतीय मूर्ती व स्थापत्य संशोधन परिषद व शाम गदळे कला व विज्ञान महाविद्यालय दहीफळ(वडमाऊली) ता.केज,जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने  गुगलमीटद्वारे रात्री ८:०० ते ९:०० या वेळेत ५ दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि.२१ नोव्हेंबर रोजी “जागतिक वारसा सप्ताहाचे महत्त्व आणि जागृती” याविषयी सहाय्यक संचालक (पुरातत्त्व) छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सौ.जया विलास वाहणे यांनी गुंफले.सांस्कृतिक वारसा हा लोकांद्वारे,लोकांचा, लोकांकरिता आहे.हे नमूद करतानाच या जागतिक वारसा यांचे संवर्धन व जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
दि.२२ नोव्हेंबर रोजी ‘कोकणातील प्राचीन स्थापत्य आणि शिल्पसंपदा’ याविषयी डॉ.अंजय धनावडे (जगताप कॉलेज महाड,रायगड) यांनी कोकणातील समृद्ध शिल्प संपदेचा इतिहास व प्राचीन स्थापत्य विषयी सखोल मार्गदर्शन केले.

‘देवगिरी प्राचीन जैन वारसा स्थळ’ या विषयावर दि.२३ नोव्हेंबर रोजी श्री ओशिन बंब डेक्कन कॉलेज,पुणे यांनी प्राचीन जैन वारसा स्थळ व या विषयी सखोल व विस्तृत विवेचन करत देवगिरीच्या परिसराविषयीच्या नव्या पैलूची ओळख करून दिली.

“शिव… भोगी ते योगी..”
या विषयाच्या माध्यमातून दि.२४ नोव्हेंबर रोजी आदित्य फडके सातारा यांनी शिवाचा वेदापासून सुरू झालेला प्रवास वर्णन करतांना…शिवाचे पार्वती-गणपती- कार्तिकेय यांच्याशी असलेल्या सहसंबंधाविषयी माहिती देतांना शिवाच्या विविध स्वरूपातील हस्तमुद्रा,योगमुद्रा विस्तृत विवेचन केले.

कोल्हापूर येथील लेणी आणि मंदिर स्थापत्य याविषयी दि.२५ नोव्हेंबर रोजी डॉ.योगेश प्रभुदेसाई आपल्या मधुर वाणीने कोल्हापूर परिसरातील मंदिर स्थापत्य व लेणी-स्थापत्य या विषयी मार्गदर्शन करत कोल्हापूरचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
या पाच दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी,अभ्यासक व नवसंशोधक विद्यार्थांची ऑनलाइन उपस्थिती होती.या व्याख्यानमालेला यशस्वी करत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय मूर्ती व स्थापत्य संशोधन परिषदेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असून मूर्ती शास्त्र संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरविंद सोनटक्के यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !