भोकर मतदार संघातील १४४ पैकी ४ अर्ज बाद;तर मा.आ.अमिता चव्हाण सह १७ जणांची माघार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील एकूण १४४ नामनिर्देशन पत्रांपैकी ४ जणांचे नामनिर्देशन पत्र दि.३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत ४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र बाद झाल्याने १४० जणांचे नामनिर्देशन वैध ठरली होती. तर त्यापैकी माजी आमदार अमिता अशोक चव्हाण यांसह एकूण १७ उमेदवारांनी दि.३१ ऑक्टोबर रोजी आपले नामनिर्देशन पत्र माघार घेतली असल्याने आता १२३ उमेदवारांचे नामनिर्देशन शिल्लक राहिले आहेत.
८५-भोकर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दि.२९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १४४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.तर दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या छाननीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंडेकर यांच्या सुविद्य पत्नी सपना तिरुपती कदम यांचे पर्यायी नामनिर्देशन पत्र बाद झाले.तर एकाचे वय कमी असल्याने व दोघांची माहिती अपुर्ण असल्याने अशा एकूण ४ जणांचे नामनिर्देशन पत्र बाद झाले. त्यामुळे एकूण १४० उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरली होती.त्यापैकी माजी आमदार अमिता अशोक चव्हाण यांसह तुकाराम बिराजदार,विजयमाला गायकवाड,चंद्रप्रकाश सांगवीकर,संजय घोरपडे,आनंदा नागलवाड,ॲड.मारोतराव हुक्के पाटील,वैशाली हुक्के पाटील,बालाजी कुलकर्णी,अशपाक अहमद गुलाम हबीब,प्रमोद कामठेकर,शिवशंकर बडवणे,उषाताई भालेराव, सलीम अहेमद अब्दुल कादर,जुल्फेखान जिलानी सय्यद, अशफाक अहमद एकबाल अहमद,खान अलायार युसूफ खान या १७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतले आहेत.त्यामुळे आता एकूण १२३ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले आहेत.यात भाजपा महायुतीचे उमेदवार ॲड.श्रीजया अशोक चव्हाण,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंडेकर,जनहित लोकशाही पक्षाचे उमेदवार नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड,प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार नामदेव आयलवाड,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड, इंजि.विश्वंभर पवार,मनसेचे उमेदवार साईप्रसाद जटालवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे साहेबराव गोरठकर,राष्ट्रीय मराठा पार्टीचे माधव सूर्यवंशी यांसह आदींचा समावेश आहे.८५-भोकर विधानसभा मतदार संघात सन २००९ पुर्वी अशा प्रकारे भरमसाठ नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रथा नव्हती.परंतू माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची या मतदार संघात एन्ट्री झाल्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करायचे व नंतर ‘मनधरणी’ झाली की ते माघारी घ्यायचे या ‘रोगाची’ प्रथा प्रचलित झाली आहे.त्यामुळे पाहुयात की,दि.४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कोणाकोणाची मनधरणी झाल्याने माघार होते व कोण रुसून मैदानात राहते.