Sat. Dec 21st, 2024

भोकर मतदार संघातील नागनाथ घिसेवाड यांच्या विरुद्धच्या हरकतीचा बार ठरला फुसका

Spread the love

कोण आहेत बहुजनांचे नेते नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड ?

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननी दरम्यान एकाने वकीला मार्फत जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार नागनाथ घिसेवाड यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात इंडियन ऑईल कंपनीचा लाभ घेतल्याची माहिती शपथ पत्रात लपविली असल्याची हरकत घेऊन त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्याची मागणी केली होती,परंतू सदरील कंपनीचा करार गेल्या पाच वर्षांपूर्वीच संपल्याचा सक्षम युक्तीवाद नागनाथ घिसेवाड यांच्या वकीलाने केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी त्या हरकतीचा दावा फेटाळला.त्या हरकतीचा बार फुसका ठरल्याने नागनाथ घिसेवाड यांच्या समर्थकांनी भव्य आतिषबाजी करुन दिवाळी साजरी केली.

होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ८५-भोकर विधानसभा मतदासंघातील उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची छाननी दि.३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी भोकर तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय,भोकर च्या बैठक कक्षात सुरु करण्यात आली असता याच दरम्यान अतुल मुकुंदराव पाईकराव यांच्या वतीने विधिज्ञ ॲड.श्रीपत नामदेवराव इजळीकर यांनी नामनिर्देशन दाखल केलेले उमेदवार नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड यांनी Indian Oil Corporation Ltd. ही कंपनी Govt.Owned Organization असून या कंपनीचा लाभ त्यांनी घेतलेला असतांनाही ही माहिती त्यांनी नामनिर्देशन पत्रातील शपथपत्रात लपविली असल्याने लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम ९ (अ) प्रमाणे (Disqualification) सदर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अपात्र करण्यात यावे,असा युक्तिवाद हरकतदाराचे वकील ॲड.श्रीपत इजळीकर यांनी विविध न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ देत केला.

सदरील हरकतीच्या सुनावणी दरम्यान उमेदवार नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड त्यांचे विधिज्ञ ॲड.सिध्दार्थ कदम यांनी सक्षमपणे बाजू मांडली.यात निवडणूक निर्णय अधिकारी यांना शपथपत्रातील सत्यतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला.तसेच उमेदवाराचे शपथपत्र सद्यस्थितीचे दिले असून नागनाथ घिसेवाड व Indian Oil Corporation Ltd.यांच्या मध्ये घाऊक विक्रेता म्हणून असलेला करार हा दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी संपुष्टात आला असून नामनिर्देशनपत्र धारक व कंपनी यामध्ये कसल्याही प्रकारचे कराराचे नूतनीकरण झालेले नाही,असे म्हणणे लेखी स्वरूपात दिले.आक्षेपधारकाचे आरोप व उमेदवाराचे म्हणणे लक्षात घेता मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेच्या अनुषंगाने शपथपत्रातील माहितीची सत्यता तपाण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी यांना नाहीत.उमेदवाराने सदर Indian Oil Company चे नूतनीकरण नंतर केले नसल्याने व सदर Company ही केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील असल्याने Contract With Appropriate Government चा मु‌द्दा हा विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने लागू होत नाही The Represntation Of People Act 1951चे कलम 9 (A) चा Disqualification चा मुद्दा ही लागू होत नाही. निवडणूकीतील उमेदवारी संदर्भात Office Of Profit साठी एखादे पद त्या अंतर्गत येते का,हे ठरविण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालय यांचे शिवकुमार स्वामी इनामदार विरुध्द अगडी संगण्णा आंदेनप्पा या खटल्याचा आधार घेण्यात येतो. त्यानुसार उमेदवार हे Indian oil Corporation चे घाऊक विक्रेता या नात्याने असलेले पद हे शासन नियुक्त नसल्याने अथवा सदर पदावरून हटविण्याचे अधिकार शासनास नसल्याने अथवा सदर पदाकरिता कोणतेही घटक Reemuneration/Allowance मिळत नसल्याने सदर घाऊक विक्रेता हे लाभाच्या पदांतर्गत येत नाहीत.असा युक्तिवाद केला.हरकतदार व उमेदवार यांच्या वकीलांत झालेल्या युक्तीवादाअंती ८५- भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी अतुल पाईकराव यांची हरकत नामंजूर करुन हरकत अर्ज फेटाळला व नागनाथ घिसेवाड यांचे नामनिर्देशनपत्र वैध असल्याचा निर्णय दिला.यामुळे नागनाथ घिसेवाड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा विरोधकांचा डाव फसला असून हरकतीचा बार फुसका ठरला आहे.त्यांचा हा डाव हाणून पाडल्यामुळे नागनाथ घिसेवाड यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन दिवाळी साजरी केली आहे.

कोण आहेत बहुजनांचे नेते नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड ?

कोळगल्ली भोकर येथील रहिवासी असलेल्या एका गरीब कुटुंबात नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड यांचा जन्म झाला.संघटन,नेतृत्व गुण व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचा बाणा अंगी असल्याने त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शैक्षणिक काळा दरम्यान विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले.महाविद्यालयीन शिक्षणानंतर शोषित,पिडीत,वंचित, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यक्षरित्या अनेक आंदोलने व लढ्यात सहभाग घेतला.यामुळे त्यांना सर्व धर्मीय लोक ‘बहुजणांचे नेते’ म्हणून येथे संबोधतात. राजकीय क्षेत्रात पदार्पण करुन त्यांनी सर्वप्रथम सन १९९५ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून भारीप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली.यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर हे ३६ हजार १८३ मते घेऊन विजयी झाले व अपक्ष उमेदवार बालासाहेब गोपाळराव देशमुख उर्फ बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांना ३४ हजार ४११ मते मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले.भारीप बहुजन महासंघाचे उमेदवार नागनाथ घिसेवाड यांना १६ हजार ४६८ मते मिळाली व ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.तर सन १९९९ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून भारीप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली असतांना अपक्ष उमेदवार बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांच्या विरुद्धची लढत अटीतटीची झाली.यात बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांना ३५ हजार ४११ मते मिळाली व ते विजयी झाले.तर नागनाथ घिसेवाड यांना ३२ हजार ७७३ मते मिळाली व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले.यावेळी अवघ्या २ हजार ६३८ मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला.पुढे सन २००४ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात मोठी लढत झाली.यावेळी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना ५१ हजार ६९४ मते मिळाली व ते विजयी झाले.तर नागनाथ घिसेवाड यांना ४४ हजार ९९२ मते मिळाली व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि निसटता पराभव झाला.परंतू पुढील राजकीय कारकिर्दीत त्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती,जिल्हा परिषद सदस्य व भोकर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून लोकप्रतिनिधित्व केले.त्यांचा शहरी व ग्रामीण भागातील जनतेशी दांडगा जनसंपर्क आहे. यामुळे ते जर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर पुढील उमेदवारांना चांगला फटका बसण्याची शक्यता असते.म्हणून या धास्तीने विरोधकांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतू त्यांचा हा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला असल्याने विरोधकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !