ॲड.श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहिर झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भोकर मध्ये केला जल्लोष
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ९९ उमदेवारांची यादी दि.२० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली.यात नांदेड जिल्ह्यातील विद्यमान तीन आमदारांसह राज्याचे लक्ष असलेल्या भोकर विधानसभा मतदार संघासाठी खा.अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड. श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केल्याचा समावेश असल्याने भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकत ढोल ताशा व भव्य आतिषबाजी करुन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून भोकर विधानसभा मतदार संघाच्या भावी आमदार म्हणून त्यांच्या कन्या ॲड.श्रीजया चव्हाण यांचे नाव पुढे आणले होते.याच अनुषंगाने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदार संघातील अनेक गावांत भेटी गाठी,प्रचार सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला.उमेदवारी मिळणारच अशी शास्वती असल्याने संपूर्ण मतदार संघ पिंजून काढण्यात आला.याच दरम्यान दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी महायुतीच्या उमेदवार म्हणून ॲड. श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपासह महायुतीतील घटक पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत आनंद झाला.याच अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे महायुतीच्या वतीने ढोल ताशा व भव्य आतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.
या जल्लोषात सभापती जगदिश पाटील भोसीकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,तालुका समन्वयक भगवान दंडवे,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,उपसभापती बालाजी शानमबाड,प्र.का.स.संतोष मारकवार,माजी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शेख युसूफ,भाजपा शहर अध्यक्ष विशाल माने,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वेणू पाटील कोंडलवार,माजी नगरसेवक मनोज गिमेकर,मिर्झा ताहेर बेग, संचालक केशव पाटील पोमनाळकर,गणेश राठोड,सारंग मुंदडा,रामदास सोनवाडे,सुनिल शहा,गौतम कसबे,योगेश पाटील,संदिप येलूरे,अमोल आलेवार,विठ्ठल पाटील धोंडगे, ऋषिकेश स्वामी,गोविंद मेटकर,फारूख जहागीरदार करखेलीकर,शेख.नाजिम,सय्यद रफिक,अर्शद अहेमद,निशाद ईनामदार,सुलोचनाताई ढोले,मन्सूर पठाण,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(अजित पवार गट) चे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,तालुका सचिव महेंद्र काबळे,युवक शहराध्यक्ष शेख मजहर,यांसह आदींचा समावेश होता.