सर्वसामान्यांच्या मुलभूत विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मी राजकारणात आलोय-अरुण चव्हाण

राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार म्हणून उमेदवारी मागणारे एक व्रतस्थ समाजसेवक अरुण भाऊ चव्हाण यांनी ‘अंबुज प्रहार न्युज लाईव्ह’ वर त्याविषयी मांडली भूमिका…
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : मी भोकर विधानसभा मतदार संघातील चिदगिरी ता.भोकर तेथील एक समाजसेवक असून सामाजिक समस्यांची जाण असल्याने येथील शोषित,पिडीत,वंचित, उपेक्षित समाज व शैक्षणीक,सामाजिक,राजकीय,शेती आणि उद्योग यासह आदी क्षेत्रांतील सर्वसामान्य माणूस मुलभूत विकासापासून कोसो दूर असल्याचे मला अभ्यासता आले आहे.त्यांच्या समस्या केवळ सामाजिक कार्यातून सुटणाऱ्या नसल्याने राजकीय सत्तेत सहभागी होणे गरजेचे आहे.म्हणूनच सर्वसामान्यांच्या मुलभूत विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी राजकारणात आलो आहे.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मला आगामी विधानसभा निवडणुकीत ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी जनतेचे हे सेवाकर्तव्य पुर्ण ताकदीने पार पाडेल.असा निर्धार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार अरुण उर्फ अरविंद दिगंबर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला आहे.
मौ.चिदगिरी ता.भोकर येथील एक उच्च शिक्षित व समाज सेवेचे व्रत्त हाती घेऊन गौर सेनेच्या माध्यमातून देशातील २३ राज्यात समाजसेवा करणारे अरुण भाऊ चव्हाण यांसारखे ब्रम्हचारी व्यक्तीमत राजकीय क्षेत्रात आले असून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली आहे.त्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,मी समाज सेवा करण्यासाठी संबंध देश फिरलो आहे.फिरत असतांना अनेकांच्या अनेक समस्या मला अभ्यासता आल्या.परंतू देश स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर ही मी ज्या गावात जन्मलो आहे त्या गावचा व हे गाव ज्या विधानसभा मतदार संघात आहे त्या भोकर विधानसभा मतदार संघातील शोषित,पिडीत,वंचित,उपेक्षित समाज आणि शैक्षणीक,सामाजिक,राजकीय,शेती,उद्योग यासह आदी क्षेत्रांतील सर्वसामान्य माणूस मुलभूत विकासापासून कोसो दूर असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.सर्व जाती,पंथ, धर्मातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मतदार संघातील भोकर,मुदखेड आणि अर्धापूर या तीन ही तालुक्यात उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये उपलब्ध झाली नाहीत.इंजिनियरींग असो व मेडिकल यांसह आदी क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी नांदेड व अन्य जिल्हा स्थानी जावावे लागते.ही बाब परवडणारी नसल्याने गरिब व होतकरू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.तर जे शिकले आहेत त्या गरिब व होतकरू सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा कोणताही मोठा उद्योग किंवा रोजगार येथे उपलब्ध झालेला नाही.एम.आय.डी.सी.आहे,परंतू अद्याप तरी येथे एकही मोठा उद्योग किंवा कारखाना उभारण्यात आलेला नाही.एकमेव भाऊराव सहकारी साखर कारखाना आहे,परंतू तो एका बड्या राजकीय नेत्याच्या अधिपत्याखाली असल्याने तो कारखाना सुशिक्षित बेरोजगार किंवा शेतकऱ्यांच्या ही उपयोगाचा नाही.
तसेच या मतदार संघात ऊस,केळी,हळद,कापूस,सोयाबीन यांसारखे शेती उत्पन्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.परंतू त्या शेतीमालाला योग्य हमी भाव येथे मिळत नाही किंवा या शेती उत्पनावर प्रक्रिया करणारा मोठा कारखाना,उद्योग नाही व मोठ्या बाजारपेठेत तो माल पाठविण्यासाठी बाजारपेठ आणि साधणे ही उपलब्ध नाहीत.मोठ्या प्रमाणात सिंचन व्यवस्था ही नाही.यामुळे येथील शेतकरी मुलभूत गरजांपासून वंचित आहे. एकूणच असे की,येथील उपरोक्त घटकांसह सर्वसामान्य माणूस त्याच्या मुलभूत विकासापासून कोसो दूर व वंचित राहिलेला आहे.त्यांच्या मुलभूत विकासाचा अनुशेष भरुन काढणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे कर्तव्य एक निस्वार्थ माणूसच प्रामाणिकपणे करु शकतो.यासाठी राजकीय सत्तेत सहभागी होणे ही गरजेचे आहे.म्हणूनच माझी सामासेवी भुमिका सोबत घेऊन राजकीय क्षेत्रात मी आलो आहे.अविवाहित राहून अख्खी हयात जनसेवा करण्याचे मी व्रत्त हाती घेतलो आहे.मी एक अविवाहित व्यक्ती असल्याने राजकीय क्षेत्रात येऊन ‘अर्थकारण’ करण्यात माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही व जनसेवेसाठी मी २४ तास उपलब्ध होऊ शकतो आणि सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्न मी सोडवू शकतो.या निस्वार्थ सेवा भावानेच मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केलो आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे ‘सेक्युलर’ विचार धारेचे असल्याने सर्व धर्मातील वंचितांचे प्रश्न ते सोडवू शकतात,असे माझे मत असून मतदार संघातील बंजारा समाज आणि इतर सर्व समाजातील बहुसंख्य मतदार बांधव माझ्या पाठीशी आशिर्वादरुपाने उभे आहेत.या बळावर व विश्वासावरच मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली असून मला उमेदवारी दिल्यास नक्कीच विजयी होईल व सर्व सामान्यांचे मुलभूत प्रश्न सोडविन,असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.एका विशिष्ट समाजातील व केवळ तीन घराण्यातील व्यक्तींनीच भोकर विधानसभा मतदारसंघातून आजपर्यंत आमदारकी उपभोगली आहे.तर आता ओबीसी समाजातील तरुण चेहरा अरुण भाऊ चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे,हे त्या विशिष्ट समाजातील उमेदवारांपेक्षा वेगळेपण आहे.पाहुयात त्यांना पक्षश्रेष्ठी उमेदवारी देते का ते ? दिल्यास नक्कीच सुजाण मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने राहिलं असे वाटते.त्यासाठी त्यांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा!