भोकर येथे आज स्मृ.प्रविण वाघमारे यांच्या ९ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिर

हायड्रोसिल,हर्निया,अपेंडीक्स व शरिरावरील गाठी यांसह आदींचा यात समावेश असणार आहे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील यश हॉस्पिटलचे संचालक तथा समाजसेवी डॉ.साईनाथ वाघमारे यांचे बंधू स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या ९ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व हायड्रोसिल,हर्निया, अपेंडीक्स व शरिरावरील गाठींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा गरिब व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भोकर येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले सेवाभावी डॉ.साईनाथ वाघमारे यांचे बंधू स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिवर्षी गरिब व गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते.यावर्षी देखील दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी यश हॉस्पिटल,पंचायत समिती समोर भोकर येथे हायड्रोसिल,हर्निया,अपेंडीक्स,मुळव्याध शरीरावरील गाठी यासह आदी आजारांची तपासणी करण्यात येऊ पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील शिबिराच्या अध्यक्षस्थानी भोकर चे तहसिलदार सुरेश घोळवे हे राहणार आहेत.तर उद्घाटक म्हणून शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर चे अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण व प्रमुख पाहुणे म्हणून भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरात विवेकानंद हॉस्पीटल,नांदेड चे डॉ.जीवन पावडे(एम.एस),अपेक्षा हॉस्पीटल,नांदेड चे डॉ.दिलीप फुगारे (एम.एस.),आयकॉन हॉस्पीटल,नांदेड चे डॉ. संतोष अंगरवार (एम.एस.),भुलतज डॉ.अनंत चव्हाण, भुलतज्ञ डॉ.बाळासाहेब बिराडे (एम.डी.),भुलतज्ञ डॉ. धम्मदिप कदम (एम.डी.), फिनिक्स हॉस्पीटल,नांदेड चे डॉ.कृष्णा घोडजकर (एम.डी.), मुळव्याध व भगंदर तज्ञ डॉ.श्रीराम कल्याणकर,मुळव्याध व भगंदर तज्ञ डॉ.हेमंत इंगळे (एम.एस) यांसह आदी डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.आणि पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.तरी या शिबिराचा गरिब व गरजू रुग्णांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा,असे विनंतीपर आवाहन डॉक्टर्स असोसिएशन,भोकर चे अध्यक्ष डॉ.राम नाईक जाधव,केमिस्ट असोसिएशन,भोकर चे अध्यक्ष राजु रेड्डी लोकावाड यांसह शिबिर आयोजन समितीच्या वतीने केले आहे.