खुपच धक्कादायक – पाळज येथे अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्त्याचार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील एका तांड्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच गावातील एक जण व त्याचा टेम्पो चालक मित्र अशा दोघांनी मिळून पाळज ता.भोकर येथे जबरदस्तीने जीवे मारण्याची धमकी देऊन सामुहिक अत्त्याचार केल्याची निषेधार्य अमानुष घटना घडली आहे.तालुक्यातील एका ८ वर्षीय निरागस चिमुकलीवर अत्त्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पवित्र तीर्थक्षेत्र परिसरात दि.१४ सप्टेंबर रोजी ही दुसरी निषेधार्य घटना घडली असून याप्रकरणी ‘त्या’ नराधम दोघांविरुद्ध दि.१५ सप्टेंबर रोजी भोकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर तालुक्यातील एका तांड्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिचे आई वडील व गावकऱ्यांसोबत गावातील एका टेंपोने दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ७:०० वाजताच्या दरम्यान श्री गणेशोत्सव निमित्ताने तीर्थक्षेत्र पाळज ता.भोकर येथील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गेली होती.ती व तिचे आई वडील दर्शनाच्या रांगेत थांबले.त्या रांगेत ती थोडे समोर उभी राहिली होती.त्यामुळे तिचे दर्शन आई वडीलांच्या अगोदर झाल्याने ती मंदीराबाहेर येऊन थांबली.गर्दी असल्याने तिचे आई वडील दर्शन रांगेतच मागे राहिल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत.यावेळी रात्री ९:१५ वाजताच्या दरम्यान ती एकटीच उभी असल्याचे पाहून तिच्या घराशेजारी राहणारा शंकर ऊर्फ कोंडिबा उत्तम पवार हा तिच्या जवळ आला व म्हणाला की, चल तुला आकाश पाळण्यात खेळवितो.परंतू यास तिने नकार दिला.यावेळी भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गच्या रस्त्याच्या कामासाठी त्याला व गावातील काही जणांना टेम्पो द्वारे ने आण करणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील टेम्पो चालक कुणाल दिलीप राठोड या मित्राच्या टेम्पोकडे तिचा हात धरुन त्याने ओढत नेले.अगोदरच कुणाल राठोड हा त्या टेम्पो जवळ उभा होता.त्या दोघांनी तिला जबरदस्तीने त्या टेम्पोत नेले व कुणाल राठोडने तिचे तोंड दाबून धरले आणि शंकर पवारने तिचे कपडे काढले.मला जाऊ द्या म्हणत तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला,परंतू तोंड दाबून धरल्याने त्या असह्य मुलीचा आवाज टेम्पो बाहेर गेला नाही.तिचे तोंड दाबून धरुन प्रथम कुणाल राठोड व त्यानंतर शंकर पवार या दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने आळीपाळीने शारिरीक संबंध केले.याच दरम्यान दर्शन घेऊन तिचा शोध घेत असलेले तिचे आई वडील त्या टेम्पोकडे येत असल्याचे पाहून झालेल्या प्रकाराबद्दल तू कोणास काही सांगितलेस तर तुला जीवे मारुन टाकू म्हणून धमकी देऊन पिडीत मुलीला टेम्पो बाहेर सोडून रात्री ९:४५ वाजताच्या दरम्यान त्या दोघांनी पळ काढला.
जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या त्या पिडीत मुलीने आई वडीलांना काही सांगितले नाही व रात्री उशिरा ती आपल्या आई वडिलांसोबत घरी परतली.परंतू झालेल्या अमानुष अत्त्याचाराने तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने त्या घटनेबाबत तिच्या चुलतीस सविस्तर सांगितले.यानंतर चुलतीने तिचे काका,वडील व कुटूंबियांना झालेल्या अमानुष घटनेबाबत सांगितले.रात्री खुप उशिर झालेला होता म्हणून ती व तिचे कुटूंबिय भोकर पोलिस ठाण्यात येऊ शकले नाहीत.तर दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी ती पिडीत मुलगी चुलती व तिच्या कुटूंबियांसमवेत भोकर पोलिस ठाण्यात आली आणि तिने उपरोक्त आशयानुसार एका महिला सामाजिक कार्यकर्ती समक्ष जबाब लिहून दिला.तिच्या जबाबानुसार अर्थातच फिर्यादीवरुन शंकर उर्फ कोंडिबा उत्तम व कुणाल दिलीप राठोड या दोघांविरुद्ध गु.र.नं.३४३/ २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७०(२),१३८,३५१ (२)(३),३(५) व सह कलम ४,८,१२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा ‘पोक्सो’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला सहायक पो.नि. कल्पना राठोड या करत आहेत.तालुक्यातील एका ८ वर्षीय निरागस चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांनाच पाळज सारख्या पवित्र तीर्थक्षेत्र परिसरात या अल्पवयीन मुलीवर ‘त्या’ दोन नराधमांनी अत्त्याचार करुन माणुसकीला काळीमा फासण्याचा निषेधार्य प्रकार केला असल्याने पिडीत मुलीच्या गावातील व तालुक्यातील नागरिकांतून निषेध व्यक्त होत आहे.