सार्वजनिक गणेश मंडळ भोकर च्या वतीने श्रीमद भागवत कथा व राम कथेचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सार्वजनिक गणेश मंडळ भोकर च्या वतीने यावर्षीच्या श्री गणेश उत्सवात दि.१० ते १७ सप्टेंबर दरम्यान श्रीमद भागवत कथा व श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य शिबिर,व्याख्यान व राष्ट्रीय किर्तन यांसह विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दि.१० ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजता पर्यंत आयोजन करण्यात आले असून या भागवत कथेचे प्रवक्ते ह.भ.प. गजानन बाबा कळमनुरीकर हे राहणार राहणार आहेत.तसेच सायंकाळी ७:०० ते १०:०० वाजता पर्यंत श्री राम कथा होणार आहे.या राम कथेचे प्रवक्ते प.पू.बालयोगी आचार्य गजेंद्रजी चैतन्य स्वामी महाराज हे राहणार आहेत.तर दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत आरोग्य शिबिर होणार आहे.दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेदरम्यान महंत प्रभाकर बाबा कपाटे यांचे व्याख्यान होईल.दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत प्रा.डॉ.प्रशांत ठाकरे यांचे किर्तन आयोजित करण्यात आलेआहे.तर दररोज दुपारी २:०० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे.याचबरोबर दररोज सकाळी ६:०० ते ७:०० या वेळेत आर्ट ऑफ लिव्हींग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तर दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० ते ५:०० वाजताच्या दरम्यान रुद्र पूजा व सायंकाळी ६:०० ते ७:०० वाजताच्या दरम्यान सामुदायिक प्रार्थना होईल.तसेच दररोज सायंकाळी ६:३० वाजता प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय केंद्र गंदेवार कॉलनी भोकर यांचे अध्यात्मिक प्रवचन होईल. तरी उपरोक्त सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.