रामगिरी महाराज व आ.नितेश राणे यांच्या अभद्र वक्तव्याच्या भोकर मध्ये जाहीर निषेध
उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालया समोर मुस्लीम बांधवांनी निषेधार्थ केले धरणे आंदोलन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पैगंबर हुजूर मोहम्मद सल्लल्लाहू अलेही वसल्लम यांच्या संदर्भात रामगिरी महाराज व आ.नितेश राणे यांनी अभद्र वक्तव्य करून दोन धर्मियांत तेढ निर्माण करण्याचे काम नुकतेच केले आहे.ही बाब तीव्र निषेधार्थ असल्याने दि.६ सप्टेंबर रोजी भोकर शहरातील मुस्लिम बांधवांनी ‘त्या’ वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.तसेच अभद्र वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज आणि आ.नितेश राणे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सद्गुरु गंगातीरी रामगिरी महाराज व आ.नितेश राणे हे नेहमिच मुस्लिम समाजा विरोधात गरळ ओकत असतात.असे मुस्लिम बांधवांनी म्हटले असून मौ.पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या सप्ताह चे प्रवचन चालू असताना उपस्थित जनसमुदायासमोर आणि थेट प्रक्षेपण सुरू असताना रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याच्या हेतूने आपत्ती जनक अभद्र वक्तव्य केले आहे.तसेच आ.नितेश राणे हे देखील वारंवार मुस्लिमांविषयी आक्षेपार्य वक्तव्य करत आहेत.त्यांच्या त्या वक्तव्यांमुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.असे होऊन देखील राजकिय दबावामुळे रामगिरी महाराज व आ.नितेश राणे यांना अद्याप तरी अटक करण्यात आली नाही.त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरली असून त्यांच्या ‘त्या’ अभद्र वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दि.६ सप्टेंबर २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
भोकर शहरातील सर्व मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली व धरणे आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी मौलाना रिजवानोद्दीन,मुफ्ती मौलाना खुर्शीद अहमद,हाफेज उमर फारूक,मौलाना जुबेर,हाफिज शमशाद,मौलाना मुबीन खान इनामदार यांसह आदींनी निषेधपर मनोगत व्यक्त केले.तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी भूमिका जाहीर केली.याचबरोबर केंद्र सरकारच्या वतीने लोकसभा सभागृहात मांडण्यात आलेल्या नवीन वक्फ जमिनी संदर्भातले विधेयक मागे घेण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली.सदरील मागण्यांच्या संदर्भाने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती,पंतप्रधान,केंद्रीय गृहमंत्री,राज्याचे मुख्यमंत्री,राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री,जिल्हाधिकारी नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड,अपर पोलीस अधीक्षक भोकर,उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर,पोलीस निरीक्षक भोकर यांना पाठविण्यात आले.सदरील निवेदन देताना व धरणे आंदोलनात मौलाना रिजवान सरवरी,मौलाना आमेर,मौलाना खालेद, मौलाना इमरान नदवी,हाफेज आमेर हाफेज फैजान,हाफेज फुरखाॅन,मौलाना फहिमोद्दीन,मौलाना निजाम,मौलाना हाफेज अकबर,मौलाना आमेर,मौलाना हाफेज शाहेद,हाफेज शाहेद पटेल,मौलाना सुजाओद्दीन,मौलाना जमील,मौलाना मस्लियोद्दीन यांसह मुस्लिम धर्मगुरु व मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.