Fri. Apr 18th, 2025

खा.वसंतराव चव्हाण यांचा आज भोकर विधानसभा मतदार संघात ऋणानिर्देश दौरा

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी आज दि.१९ जून रोजी भोकर येथे येत असून ते मतदारांच्या भेटी घेणार आहेत.

महायुती व महाविकास आघाडीच्या अटीतटीच्या व प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना मतदारांनी बहुमताने निवडून देऊन इतिहास रचला आहे,त्या अनुषंगाने मतदारांचे ऋणनिर्देश व्यक्त करणे हे नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण यांचे आद्य कर्तव्य आहे.ते कर्तव्य पार पाडण्याच्या हेतूने आज दि.१९ जून २०२४ रोजी खा.वसंतराव चव्हाण हे भोकर येथे येणार असून ते सकाळी ९:०० वाजता श्रीकृष्ण मंदिर भोकर येथे दर्शन घेऊन व आरती करणार आहेत,तर ९:३० वाजता श्री शनी मंदिर भोकर येथे दर्शन व आरती व  १०:३० वाजता श्री बालाजी मंदिर भोकर येथे दर्शन घेणार असून व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.तसेच ११:३० वाजता पाळज येथे श्री गणेश मंदिराचे दर्शन व मतदारांशी संवाद व १२:३० वाजता किनी येथे भेट देऊन मतदारांशी संवाद आणि दुपारी २:३० वाजता आडेली देवी भोकर येथे दर्शन व आरती करणार आहेत.
याचबरोबर दुपारी ३:०० वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे भोकर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी सुसंवाद जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या संवाद सभेसाठी सर्व मतदारांनी उपस्थित राहावे,असे आवाहन भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी जि.प.सभापती प्रकाश देशमुख भोशीकर,शहर अध्यक्ष तौसीफ इनामदार,सुभाष पाटील किन्हाळकर,शिवाजीराव पांचाळ,शिवाजी पाटील लगळूदकर,जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार,रज्जाक शेठ, शिवाजी देवतुळे,भीमराव दुधारे,बालाजी राजेमोड,गिरीश पाटील रावणगावकर,नईम तळेगावकर,संदीप पाटील गौड, आदिनाथ चिंताकुटे,सम्राट हिरे,मकसूद गोंदवाले,गोविंद देशमुख,मो.मुजीब,मनोरमा रेड्डी,सुरेखा माळे,कमल नर्तावार, शमीम बेगम,शफी इनामदार,अफरोज पठाण,प्रल्हाद सुकळेकर,धोंडीबा भिसे,विठ्ठल डाकोरे,मारुती झम्पलवाड यांसह आदींनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !