महायुतीस बिनशर्त पाठिंबा देऊन ही सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने ‘मनसे’ प्रचार रणांगणा बाहेरच
मनसे नेते राज ठाकरे यांचा फोटो प्रसिद्धी फलकांवर वापरत नसल्याने भोकर तालुका मनसेचा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर तुर्तास बहिष्कार- साईप्रसाद जटालवार !
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : विकास पुरुष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीस ‘बिनशर्थ पाठींबा’ दिला आहे.परंतू अद्याप तरी १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार-प्रसिद्धी फलकांवर राज ठाकरे यांचा फोटो वापला जात नाही व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिल्या जात नसल्याचा आरोप भोकर तालुका मनसे अध्यक्ष साईप्रसाद जटालवार यांनी केला आहे.ही बाब उमेदवाराच्या प्रचार प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली असतांनाही याची दखल घेतली गेली नसल्याने अद्याप तरी भोकर तालुका मनसे प्रचार रणांगणा बाहेरच आहे. तर त्यांनी तुर्तास प्रचारावर बहिष्कार टाकलेला असून सन्मानाची वागणूक मिळाल्याशिवाय ते प्रचारात हभागी होणार नाहीत,असे म्हटले आहे.
१८-व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकची रणधुमाळी सर्वत्र सुरु असून दि.१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवारांसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघातील प्रचार देखील शेवटच्या टप्प्यात पोहचला असून १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचार यंत्रणेने व प्रचार प्रमुखांनी म्हणावे तशी महायुतीतील घटक पक्षांना सन्मानाची वागणूक दिली नसल्याचा आरोप केल्या जात आहे.त्याचे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख कर्तुत्वावर विश्वास ठेऊन मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीस बिनशर्त पाठिंबा दिला आहे.परंतू महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भोकर तालुका प्रचार कार्यालयातील फलक,प्रसिद्धी पत्रकांवर ‘राज ठाकरे’ यांचा फोटो वापरला जात नाही.हा प्रकार मनसे व मनसे नेत्यांचा अवमान करणारा आहे.तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील सन्मानाची वागणूक दिली जात नाही.असा आरोप भोकर तालुका मनसे अध्यक्ष साईप्रसाद जटालवार यांनी केला आहे.याच कारणाने तुर्तास तरी त्यांनी प्रचार यंत्रणेवर बहिष्कार टाकलेला असून राज ठाकरे यांचे फोटो प्रसिद्धी पत्रक -फलकांवर टाकावेत व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी,तरच आम्ही प्रचारात सहभागी होऊ असे त्यांनी म्हटले आहे.तर महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचार प्रमुख व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.परंतू संपर्क होऊ न शकल्याने त्यांची भुमिका समजू शकली नाही.पाहुयात उर्वरित प्रचार कार्यकाळात मनसेला सन्मानाची वागणूक मिळते किंवा नाही ते?