Sun. Dec 22nd, 2024

भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते मतदार माहिती चिठ्ठीच्या वाटपास प्रारंभ

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय होऊ नये व आपण कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत आणि आपले नाव मतदार यादीत कुठे आहे याची सविस्तर माहिती त्यांना मिळावी म्हणून मतदार माहिती चिठ्ठी चे वाटप करण्यात येत आहे.सदरील माहिती चिठ्ठीचे १६-नांदेड लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येत असून ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील थेरबन ता.भोकर येथे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते त्या माहिती चिठ्ठीच्या वाटपाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली १६-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून ८५-भोकर विधानसभा मतदारसंघांतर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून निवडणूक विषयक कामे केली जात आहेत.याचाच एक भाग म्हणून दि. २६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदार माहिती चिठ्ठीची वाटप प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे.यामध्ये मतदाराचे नाव,लिंग,मतदार ओळखपत्र क्रमांक,यादी भाग क्रमांक,मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदानाचा दिनांक व मतदानाची वेळ,तसेच मतदारांच्या अडचणी बाबत हेल्पलाइन नंबर याचा समावेश आहे.
सदरील चिठ्ठी वाटप प्रक्रीयेचा शुभारंभ झाला असून दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भोकर तालुक्यातील थेरबन येथे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते व भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करंडेकर जी.एल.यांनी मतदार माहिती चिठ्ठी वाटपाची सुरुवात केली आहे.मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून या मतदार माहिती चिठ्ठीच्या वाटपाची प्रक्रिया मतदान दिवसाच्या अगोदर पूर्ण होणार आहे.तरी जास्तीत जास्त मतदारांनी दि.२६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या १६-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा,असे आवाहन भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !