नांदेड येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय कार्यशाळा मे महिन्यात होणार
आयोजन पुर्व तयारी संदर्भाने नांदेड येथे आढावा बैठक संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : राज्य व देश पातळीवर पत्रकारांच्या विविध समस्यांवर संघटनात्मक न्यायीक लढा देणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्यातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा येत्या मे महिन्यात नांदेड येथे होणार असून या कार्यशाळेच्या आयोजन संदर्भाने दि.१० एप्रिल रोजी नांदेड येथे आढावा बैठक संपन्न झाली.
येत्या मे महिन्यात नांदेड येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय एक दिवसीय कार्यशाळा होणार आहे.त्या अनुषंगाने संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी,राज्याध्यक्ष संतोष जाधव यांच्या सुचनेनुसार मराठवाडा विभागीय कार्यालय नांदेड येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष संपादक शंकरसिंह ठाकुर,मराठवाडा उपाध्यक्ष अशोक वायवळ,मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे दि.१० एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.यावेळी नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष संपादक मारोती शिकारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून होणार असलेल्या राज्य स्तरीय एक दिवसीय कार्यशाळे विषयी भुमिका विषद केली.तर उपस्थितांना मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर,मराठवाडा उपाध्यक्ष अशोक वायवळ,मराठवाडा महासचिव उत्तम बाबळे, मराठवाडा कार्याध्यक्ष दिपक सातोरे यांनी सदरील कार्यशाळा यशस्वी कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.तर सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी होणारी कार्यशाळा यशस्वी करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.
तसेच महिला कार्यकारिणीच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी वैशाली हिंगोले,भोकर तालुकाध्यक्ष पदी प्रा.आर.के.कदम, भोकर तालुका उपाध्यक्ष पदी बालाजी पाटील कदम,भोकर तालुका सचिव पदी गंगाधर पडवळे,लोहा तालुकाध्यक्ष पदी मारोती कांबळे यांसह आदींची नियुक्ती झाल्याबद्दल उपरोक्त वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यासर्वांचा यथोचित सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सदरील बैठकीचे सुत्रसंचालन स्वप्नील गव्हाणे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर डोम्पले यांनी मानले.यावेळी आकाश भालेराव,सोपान जाधव,जयभारत सूर्यवंशी,रुपाली वागरे,प्राजक्ता साखरे यांसह आदींची उपस्थिती होती.