Fri. Apr 18th, 2025

भोकर मध्ये तरुण उद्योजक सचिन वानखेडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर येथील #9 कॅफे चे मालक तरुण उद्योजक सचिन माधवराव वानखडे वय(२७) रा.शिवणी ता.हदगांव ह.मु.शशीदत्त नगर भोकर,यांनी दि.१ मार्च रोजी  सायंकाळी सायंकाळी ६:४५ दरम्यान त्यांच्या कॅफे शॉप मध्ये छताच्या लोखंडी कडिस दोरखंड अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

हदगाव तालुक्यातील शिवणी येथील तरुण उद्योजक सचिन वानखेडे यांनी मागील वर्षी भोकर -नांदेड रोड लगत,नगर परिषद कार्यालय भोकर समोर #9 कॅफे शॉप सुरु केले होते. त्याच कॅफे शॉप चे शटर बंद करून सचिन वानखेडे यांनी दि.१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६:४५ वाजताच्या दरम्यान छताच्या लोखंडी कडीस दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.बराच वेळ ते कॅफे शॉप च्या बाहेर न आल्याने परिसरातील काही नागरीकांनी शटर उघडून पाहिले असता सदरील घटना घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.ते जीवंत असतील व वाचविता यावे म्हणून त्यांना तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेण्यात आले.यावेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रेया आगलावे यांनी तपासणी केली व त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

ही माहिती भोकर पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी व शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.नि.संभाजी हनवते,सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे व पो.कॉ.प्रमोद जोंधळे यांनी रितसर पंचनामा केला.सचिन वानखेडे यांसारख्या एका उमदा तरुण उद्योजकाने आत्महत्या का केली ? हे अद्याप समजू शकले नसून भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.तर मयत सचिव वानखेडे यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,गरोदर पत्नी व एक मुलगी असा मोठा परिवार असून घरातील एक कर्ता पुरुष आणि एक होतकरू तरुण उद्योजक गेल्याने नातेवाईक, मित्रपरिवार व अनेकांतून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !