भोकर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ७८ दात्यांनी केले रक्तदान
उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेल्या रक्तदान शिबिरात भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम यांनी केले सपत्नीक रक्तदान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका,शहर व ओबीसी शाखा भोकर च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७८ दात्यांनी रक्तदान केले आहे.तर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेल्या या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी सपत्नीक रक्तदान करुन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका,शहर व युवक शाखा भोकर आणि उत्तर नांदेड जिल्हा ओबीसी विभाग च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२२ ते २८ जुलै २०२४ पर्यंत सलग ७ दिवस विविध कार्यक्रम व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून दि.२२ जुलै २०२४ रोजी डांगे फर्निचर मार्ट,विश्रामगृहा शेजारी भोकर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.सदरील शिबिराचे उद्घाटन उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार व पत्रकार मनोजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद डांगे यांसह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.उद्घाटकीय दाते म्हणून ॲड.शेख अल्तमश शमशोद्दीन,समाधान वाघ,गजू पाटील सोळंके,संजय बनसोडे,ॲड.मंगेश पेदे,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने पत्रकार गजानन गाडेकर यांनी रक्तदान केले.तर विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी सपत्नीक रक्तदान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेल्या या रक्तदान शिबिरात महिला भगिणींसह सर्व धर्मीय एकूण ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने भारतीय एकात्मतेचे व सेवाभावी वृत्तीचे चित्र यातून पहावयास मिळाले.तसेच या दात्यांचे रक्त श्री हुजूर साहिब रक्तपेढी नांदेड यांनी संकलित केले.
या रक्तदान शिबिरा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस वसंत सुगावे,नांदेड जिल्हा शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे,युवक जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे, महिला जिल्हाध्यक्षा पुजाताई व्यवहारे,महिला जिल्हा शहराध्यक्षा सुरेखा पाटील, जिल्हा शहर चिटणीस प्रवीण घुले यांसह आदींनी भेट दिली व यांतील काही पदाधिकाऱ्यांनी रक्तदान ही केले.तर भाजपा च्या भोकर विधानसभा प्रमुख श्रीजया अशोकराव चव्हाण, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील,जिल्हासरचिटणीस नामदेव वाघमारे,जिल्हासरचिटणीस श्यामराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस रवी गेंटेवार,जिल्हा चिटणीस सिद्धू पाटील चिंचाळकर,मुदखेड शहराध्यक्ष बुऱ्हाणभाई,कला व सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष राजू कोरटे,सोसिअल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,ओबीसी जिल्हा संघटक श्याम बोडेवार,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रतीक कदम,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष भिमराव हनवते,सोशल मीडिया जिल्हाउपाध्यक्ष माधव पाटील,ओबीसी तालुका उपाध्यक्ष नामदेव जाधव यांसह आदींनी भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
तर सदरील रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे, तालुका सचिव महेंद्र कांबळे शहराध्यक्ष फईम पटेल,ओबीसी जिल्हा चिटणीस सतीश चाटलवार,तालुका उपाध्यक्ष राजू पांचाळ,तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोन्दीरवाड,तालुका उपाध्यक्ष गजू पाटील सोळंके,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष निलेश खांडरे, ओबीसी तालुकाध्यक्ष तुकारामजी महादावाड,युवक शहराध्यक्ष मोहम्मद मझहरोद्दीन,सामाजिक कार्यकर्ते संदीप नरवाडे, तालुका सरचिटनीस साहेबराव वाहूळकर,तालुका सरचिटणीस दशरथ इंदरवाड,तालुका चिटणीस संजू बनसोडे,शहर कार्याध्यक्ष अविनाश आलेवार,ओबीसी शहराध्यक्ष शिवा पांचाळ यांसह आदींनी परिश्रम घेतले.