Sun. Dec 22nd, 2024

२५३ दिव्यांग व जेष्ठ आणि १३४ होमगार्ड मतदारांनी भोकर मतदार संघात बजावला मतदानाचा हक्क

Spread the love

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदार संघातून बाहेरच्या मतदार संघात सुरक्षेच्या कर्तव्यावर जाणाऱ्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने १६-नांदेड लोकसभा व ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातील हे मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून जिल्हाधिकारी तथा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातील उपरोक्त मतदारांच्या मतदानाची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि.११ नोव्हेंबर रोजी पार पाडली असून यात एकूण २५३ दिव्यांग व जेष्ठ नागरिक आणि १३४ होमगार्ड मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक व ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये म्हणून पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही जे नागरिक मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकत नाहीत अशा दिव्यांग व ८५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची (गृह मतदान)सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्या अनुषंगाने ८५-भोकर विधानसभा मतदार संघात ८४ दिव्यांग व १८१ जेष्ठ नागरिक अशा एकूण २६५ मतदारांची मतदानासाठी नोंदणी करण्यात आली होती.उपरोक्त नोंदणीकृत मतदारांच्या गृह मतदानाची प्रक्रिया दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली असून यातील दिव्यांग व जेष्ठ नागरिक अशा एकूण २५३ मतदारांनी १६-नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील एकूण १९ उमेदवारांसाठी आणि ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातील २५ उमेदवारांसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर ८५-भोकर विधानसभा मतदारसंघातील सुरक्षा गृह विभागातील होमगार्ड्स मतदारांना अन्य मतदार संघात सुरक्षेच्या कर्तव्यावर जायचे असल्याने त्यांची ही मतदान प्रक्रिया पार पडली असून यात एकूण १३४ होमगार्ड मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सदरील गृह मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असून या प्रक्रीयेच्या यशस्वीतेसाठी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार, टपाली विभाग प्रमुख सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुदखेडचे तहसिलदार आनंद देऊळगावकर,नायब तहसिलदार संतोष कामठेकर,नायब तहसिलदार एस.आर. आडेपवार,हिलालपुरे,गणेश गोडसे,गाढे,बळवांतकर, चांचलवाड यांसह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !