२८ फेब्रुवारी रोजी मातुळ येथे ५ व्या राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन

खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन;तर आ.ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण,सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, माजी जि.प.सभापती बाळासाहेब रावणगावकर,साहित्यिक देविदास फुलारी यांसह आदी मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती…
संमेलनाध्यक्षपदी प्रा.डॉ.गजानन देवकर यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मौ.मातुळ ता.भोकर येथे दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती व सप्तरंगी साहित्य मंडळ,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ५ व्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाचे या संमेलनाचे उद्घाटन नांदेड लोकसभेचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण,सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,प्रख्यात साहित्यिक देविदास फुलारी यांसह आदी मान्यवर व साहित्यिकांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश मातुळकर,निमंत्रक बालाजी सूर्यतळे आणि मुख्य संयोजक दत्ताहरी कदम यांनी दिली आहे.
संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.गजानन देवकर यांची निवड करण्यात आली असून याप्रसंगी उपरोक्त मान्यवर व साहित्यिकांसह माजी संमेलनाध्यक्ष डॉ.जगदीश कदम,माजी जि.प.सदस्य माधवराव पाटील मातुळकर,सरपंच सविता कदम, उपसरपंच माधव बोईनवाड,पो.पा.लक्ष्मण बोईनवाड,चेअरमन मधुसूदन पवार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम डांगे, पोस्ट मास्तर आनंद सुर्यवंशी,युवा नेते बबलू मातुळकर,माजी स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड,निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, शिक्षण विस्तार अधिकारी सुमन गोणारकर,जि.प.हा.चे मुख्याध्यापक पी.एस.मिस्त्री, गंगाधर जक्कलवाड,श्यामसुंदर बोईनवाड,मारुती भोकरे,सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे,राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे.
दिवसभरात ग्रंथदिंडी,चित्र व नाणी प्रदर्शन,पुरस्कार वितरण, परिसंवाद,प्रकाशने,कथाकथन,गझलसंध्या,कविसंमेलन, ठराववाचन अशा विविध सत्रांतून साहित्य संमेलन संपन्न होणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाचे होऊ घातलेले हे ५ वे राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करण्यात आले असून सकाळी ९:०० वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.संमेलनाच्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ विचारवंत बालाजी थोटवे यांच्या अध्यक्षतेखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतीविषयक धोरण आणि आजचे वास्तव’ विषयावरील परिसंवादात ॲड.गंगाधर साळवे,गजानन वानखेडे, दगडू भरकड हे आपले विचार मांडणार आहेत.तर दुपारी ४:०० वाजता कथाकथन होईल.यात सुप्रसिद्ध कथाकार दिगांबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली राम तरटे,स्वाती कान्हेगांवकर,भारत दाढेल, आ.ग.ढवळे हे आपल्या स्वरचित आणि सुरस कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.त्यानंतर गझलसंध्या हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांचा कार्यक्रम होईल.यात आत्तम गेंदे,यशवंत मस्के,रोहिणी पांडे,स्वाती भद्रे,अंजली मुनेश्वर,दिपाली कुलकर्णी,सतीश देशमुख,जयराम धोंगडे,यांच्या निशा डांगे,विजय वाठोरे,विजय धोबे,रघु देशपांडे हे गझलकार सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माराम जाधव हे असतील.पुढील सत्रात सुप्रसिद्ध कवि गजानन हिंगमिरे यांच्या अध्यक्षतेखाली ५० कविंच्या सहभागातले कविसंमेलन संपन्न होणार आहे.यात प्रमुख अतिथी कवी म्हणून बी.जी.कळसे,सौ. रुचिरा बेटकर,युवा कवि सोनू दरेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.तर समारोपीय सत्रात संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष,निमंत्रक व सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ठराव वाचन होणार आहे.
दरम्यानच्या काळात जनसंवाद विशेषांकाचे प्रकाशन व इतर प्रकाशने होणार असून मिलिंद जाधव,साहेबराव डोंगरे व संतोष तळेगावे यांचे चित्र व नाणी प्रदर्शन होणार आहे.तसेच विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना जनसंवाद विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यात जितेंद्र देशमुख,शिरीष लोणकर, सुभाष गड्डम,शिल्पाताई लोखंडे,संगिता नेत्रगावे,नागोराव लोखंडे, प्रा.ओमपप्रकाश मस्के,गंगाधर मिसाळे यांचा समावेश आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार,सचिव कैलास धुतराज, कार्यालयीन सचिव मारोती कदम,कोषाध्यक्ष शंकर गच्चे,कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य समन्वयक बाबुराव पाईकराव,महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य,जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर,सचिव चंद्रकांत कदम, यशवंत भवरे,उमेश वंजारे,प्रकाश ढवळे नागलगांवकर,राहुल जोंधळे,यशवंत क्षीरसागर,प्रल्हाद घोरबांड,पंडित पाटील बेरळीकर, संजय भारदे,शिवाजी गोडबोले,जळबा सोनकांबळे,गौतम कांबळे, विशालराज वाघमारे, सुभाष लोखंडे,शैलेश कवठेकर यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
साहित्य संमेलनस्थळ परिसराला ग्रामीण साहित्यिक रा. रं.बोराडे यांसह आदी प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचे नाव
मौ.मातुळ ता.भोकर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सप्तरंगी साहित्य मंडळाचे ५ वे राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन होणार असून या संमेलन स्थळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव,तर संमेलनाच्या परिसरास कालकथित ग्रामीण साहित्यिक रा.रं.बोराडे यांचे नाव देण्यात आले आहे.तसेच संमेलनाच्या प्रवेशद्वाराला मातुळ येथील स्वातंत्र्य सैनिक कै.विठ्ठल गंगाराम कदम यांचे नाव देण्यात आले आहे.तसेच विचारपीठाला बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.याचबरोबर काव्यमंचाला संत श्री जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.