२० फेब्रुवारीला भोकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-बाळासाहेब पाटील रावणगावकर

सभासद नोंदणीचा शुभारंभ आणि अनेक मान्यवरांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याचे करण्यात आले आहे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) च्या वतीने गुरुवार,दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:१० वाजता नवा मोंढा भोकर येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सभासद नोंदणीचा शुभारंभ व अनेक मान्यवरांचा पक्ष प्रवेश होणार आहे.तरी होऊ घातलेल्या या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषि व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांसह आदींनी केले आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर,मुदखेड व अर्धापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) वाढविण्याच्या संकल्प बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.त्या अनुशंगाने भोकर विधानसभा मतदारसंघात घर तिथं सभासद आणि गाव तिथे शाखा उभारण्यात येणार आहे.जेणेकरून भोकर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता व पुढे ओळखला जाईल यासाठी होऊ घातलेल्या मेळाव्यात सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात येगार आहे.तसेच याप्रसंगी भोकर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या अनेक मान्यवर राजकीय व्यक्तींचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश होणार आहे.
सदरील मेळावा प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,पदविधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रमजी काळे,नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,राष्ट्रवादीचे नांदेड महानगराध्यक्ष जिवन पाटील घोगरे,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमूख,अर्धापूर तालुकाध्यक्ष शशी पाटील,मुदखेड तालुकाध्यक्ष आनंद टिपरसे,नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भोकर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशभाऊ बिल्लेवाड,नांदेड जिल्ह्यातील सर्व पार्टी सेलचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,शहराध्यक्ष आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीत पार्टी सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार असून अनेक मान्यवरांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिली असून सदरील मेळाव्यास भोकर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते,पदाधिकारी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.