भोकर अतिरिक्त जिल्हा न्यायालयातील अभिवक्ता संघासाठी १२ फेब्रुवारी रोजी मतदान
या कार्यकारिणीच्या द्विवार्षीक निवडणुकीसाठी १२ उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल ; तर तिघांची झाली बिनविरोध निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील अभिवक्ता संघाच्या-२०२४ ते २०२५ करिताच्या द्विवार्षीक कार्यकारिणीची निवडणूक होत असून सदरील संघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.तर तिघांच्या विरोधात नामनिर्देशन अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.उर्वरित पदांसाठी रिंगणात असलेल्या १२ उमेदवारांसाठी दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.तसेच तिघांची बिनविरोध निवड झाली असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या या निवडणुक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून जेष्ठ विधीज्ञ ॲड.एस.एस.कुंटे व ॲड.एस.सी.कदम हे काम पाहत आहेत.
भोकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील अभिवक्ता संघाच्या होत असलेल्या निवडणूकीसाठी दि.२७ जानेवारी २०२४ ते दि.२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संघ सदस्य नोंदणी करण्यात आली.नोंदणी आक्षेपानंतर दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी नोंदणीकृत सदस्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.त्या यादीनुसार एकूण ६८ सदस्य वैध ठरले आहेत व हे सदस्य उमेदवार आणि मतदार म्हणून या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.होत असलेल्या निवडणुकीसाठी पदनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.७ फेब्रुवारी २०२४ होती.तर दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवारी अर्ज माघार घेणे निश्चित करण्यात आले होते.
उमेदवारी अर्ज माघार घेतल्या नंतर एकूण १२ उमेदवार खालील पदांसाठी रिंगणात उभे राहिले आहेत.ते पदनिहाय मतदार संघ व उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
अध्यक्ष पदासाठी -ॲड.त्रेपतराव(पांचाळ)परमेश्वर रामभाऊ, ॲड.कुंभेकर संदिप भिमराव,ॲड.सय्यद एन.क्यु.एस.एन. कादरी,उपाध्यक्ष पदासाठी-ॲड.पेदे मंगेशकुमार प्रकाशराव, ॲड.मोरे लक्ष्मीकांत लिंबाजी राव,सचिव पदासाठी-ॲड.लोखंडे प्रदिप भिमराव,ॲड. राठोड किशोर जिवाला,ॲड.पवार संतोष बालाजी,ॲड.पवन प्रदिपराव वच्छेवार,कोषाध्यक्ष पदासाठी- ॲड.दंडवे विशाल भगवानराव,ॲड.सुर्यवंशी भानुदास उत्तमराव (सोनारीकर),ॲड.पाटील हर्षवर्धन मुकिंदराव
उपरोक्त उमेदवारांच्या निवडीसाठी दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजता पर्यंत मतपत्रिकेने गुप्त मतदान होणार असून याच दिवशी दुपारी ४:३० वाजता मतमोजणी होणार आहे.तर उमेदवारी अर्ज विरोधात दाखल न झाल्याने सहसचिव पदासाठीचे उमेदवार ॲड.मेंडके प्रकाश भिवाजी,विशिष्ट सहाय्यक पदासाठीचे उमेदवार ॲड.देशपांडे निखील अरविंदराव आणि महिला प्रतिनिधी पदासाठीच्या उमेदवार ॲड.कांबळे सुजाता मुकिंदराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.रिंगणात असलेल्या उमेदवारांनी विजयी होण्यासाठी आपापली बिल्डींग लावणे सुरु ठेवल्याने ही निवडणूक मोठ्या चुरशीच्या लढतीची होत आहे.