ॲट्रासिटी ॲक्ट संरक्षण समिती अध्यक्षपदी सुरेशदादा गायकवाड,तर महासचिवपदी सतिश कावडे
विविध सामाजिक संघटना व आदींच्या उपस्थितीत ॲट्रासिटी ॲक्ट संरक्षणार्थ लढा उभारण्यासाठी नांदेड येथे गठीत करण्यात आली समिती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेला अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी ॲक्ट) कमजोर करण्याचा डाव राज्य शासनाने आखल्याचे नुकतेच निदर्शनास आले असल्याने सदरील कायद्याच्या सरक्षणासाठी व समाजावरील अन्याय अत्याचारा विषयी न्याय मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने विविध प्रकारे आंदोलन उभे करण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या अनेक सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून नांदेड येथे ॲट्रासिटी ॲक्ट संरक्षण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून सदरील समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांची,तर महासचिवपदी सतिश कावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशा वरीष्ठ पदाच्या अधिका-या मार्फत तपास केला जायचा. परंतु,दि.१० जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृहविभागाने तो तपास पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करावा असे पत्र काढले आहे.यातून सदरील कायदा कमकुवत करुन अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना न्यायापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी व ॲट्रासिटी ॲक्टच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.याच अनुशंगाने दि.३० जानेवारी २०२२ रोजी सहयोगनगर,नांदेड येथे विविध सामाजिक संघटना,पक्ष,समाजसेवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली.सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रजासत्ताक पार्टी व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड हे होते.तर अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे,गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, बसपाचे नेते दिगंबर मोरे, लोकस्वराज्य आंदोलनचे नेते प्रा.रामचंद्र भरांडे,सिपीआयचे नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांसह आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी दिगंबर मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून बैठकीची पार्श्वभूमी विषद केली.तर सतिश कावडे,प्रा.रामचंद्र भरांडे, इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर,कॉ.गंगाधर गायकवाड,मच्छिंद्र गवाले,प्रा.विठ्ठल भंडारे,ॲड.बी.एम.गायकवाड,भारत खडसे,मालोजी वाघमारे,बबिताताई पोटफोडे,ॲड. लक्ष्मीकांत दुधकावडे,प्रसेंजित मांजरमकर यांसह आदींनी उपरोक्त विषयास अनुसरून मनोगत व्यक्त केले आणि अध्यक्षीय समारोप सुरेशदादा गायकवाड यांनी केला.तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे संरक्षण करण्यासाठी व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रकारचे लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करण्यासाठी सर्वानुमते ॲट्रासिटी ॲक्ट संरक्षण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी सुरेशदादा गायकवाड व महासचिवपदी सतिश कावडे यांची निवड करण्यात आली.तर या कार्यकारीणीत उपस्थित मान्यवरांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली.ॲट्रासिटी ॲक्ट संरक्षणार्थ व कठोर अंमलबजावणीसाठी आंदोलन उभे करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असून पुढील दिशा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.
या बैठकीस प्रकाश येवले,पि.एस.गवळे,श्रीकांत गायकवाड, जे.डी.कवडे,नंदकुमार बनसोडे,जि.जे.नरवाडे,रंजित ब्राहाळीकर,संपादक उत्तम बाबळे,शिवाजी नुरूंदे,पिराजी गाडेकर,सुरेश कांबळे,स्वप्नील वाडेकर,मारोतराव चौदंते, ॲड.ए.जी.बादलगावकर,बी.बी.पवार,एस.पी.राके,अशोक गायकवाड,इंजि.शिरसे,चंद्रकांत भालेराव,मोहन लांडगे,डी. सी.जाधव,रा.म.पाईकराव,मनोज वाघमारे,गौतम पवार,बी. एम.पोटफोडे,एन.जे.गायकवाड,व्ही.पी.वाघमारे,भिमराव वाघमारे,भिमराव वनंजे,सुमेध बनसोडे,शुद्धोधन एंगडे,एस. डी.दामोदर,प्रा.गोर्विनवाड,बालाजी पाटोळे,आकाश सोनटक्के,कॉ.इरवंत गायकवाड,आनंद वंजारे,पांडूरंग शिंदे, दिगांबर वनंजे,अर्जुन रायमोळे,बापू सावंत,चंद्रमुनी कांबळे, भगवान गायकवाड,महेंद्र पिंपळगावकर,दत्ताहरी धोत्रे,गौतम मस्के,गंगाधर बसवंते,विजय गोडबोले,संदिप मोरे,शिलरत्न चावरे,संजय बोकेफोडे,ग्यानोबा नरवाडे,बापूराव हणमंते, रमेश सूर्यवंशी,जय पोटफोडे,बळीराम पोटफोडे,विशाल सोनकांबळे,राहुल तारू, जनार्धन जमदाडे,दिगांबार सोनकांबळे,दयानंद वाघमारे,विजय पोवळे यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.या महत्वपुर्ण बैठकीचे सुत्रसंचालन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे नेते परमेश्वर बंडेवार यांनी केले.तर आभार उत्तम बाबळे यांनी मानले.