Mon. Dec 23rd, 2024

१५ व्या क्षत्रिय भावसार समाज उपवधू-वर परिचय मेळावा माहितीपत्रकाचे झाले प्रकाशन

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : क्षत्रिय भावसार समाजाचा १५ वा उपवधू-वर परिचय मेळावा दि.२५ डिसेंबर रोजी नांदेड येथे होणार असून सदरील मेळाव्याचे माहिती पत्रक व नाव नोंदणी फार्मचे दि.९ ऑक्टोबर रोजी अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले आहे.

भावसार समाजातील उपवधू-वर परिचय मेळावा गेल्या १४ वर्षापासून सातत्याने घेतला जात असून यावर्षी १५ वा मेळावा दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी मातोश्री मंगल कार्यालय, नांदेड येथे होणार आहे.सदरील मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नियोजनास्तव रविवार,दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी नांदेड जिल्हा भावसार समाजाचे विश्वस्त दिगंबरराव बुलबुले,लक्ष्मीकांतजी माळवतकर, अध्यक्ष गंगाधरराव बडवणे,सचिव सुरेश गोजे,कार्यअध्यक्ष गिरीष बुलबुले,अध्यक्ष सोमनाथ भागानगरे (भावसार सेवा संघ),सौ.विणाताई माळवतकर(अध्यक्षा भावसार प्रगती महिला मंडळ),यांसह आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत एक व्यापक बैठक घेण्यात आली.यावेळी मेळावा यशस्वीतेसाठी विविध समित्यां नियुक्त करण्यात आल्या व सर्व समिती प्रमुखांना कामाचे स्वरूप आणि जबाबदारी वाटप करण्यात आली.तर याप्रसंगी प्रा. घन:श्याम येळणे,डॉ.विजय काटकाडे,मनोज सवणे यांनी यास अनुसरुन समयोचित मार्गदर्शन केले.तसेच नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारिणीच्या वतीने सर्व समाज बांधवांना तन-मन- धनाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

याच बरोबर उपवधछ-वर परिचय माहितीपत्रक व नाव नोंदणी फार्मचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीनिवास सितावार,संजय गुंडाळे,प्रविण गंडरघोळ, राजेश सूत्रावे,शिवराज पेंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी भावसार समाज कार्यकारणीतील मुरलीधर गोजे,विनोद सूत्रावे,प्रकाश उखळे,संजय बुलबुले,माणिकराव देवतराज,वसंत कंकाळ,अशोक सितावार,मधुकर फटाले,प्रभाकर पेटकर,चंद्रकांत बडवणे, श्रीनिवास बुलबुले,कल्पनाताई पूरनाळे,तसेच प्रगती महिला मंडळातील अनु मेहेत्रे,सुनिता सुत्रावे,छाया माळवतकर,जयश्री माळवतकर,गायत्री बडवणे,अर्चना वळसे,संगीता फटाले,संगिता बुलबुले,प्रतिभा अपसिंगेकर,मुक्ता पेटकर,भावसार युवा कार्यकारिणीचे दत्तराज फटाले,विशाल हिरास,महेश टने,कमलकिशोर महात्मे आणि भावसार सेवा संघातील गजेंद्र गुंडाळे,रमाकांत लोखंडे,गिरीष केदार,विनोद बडवणे यांसह समाजातील प्रतिष्ठित नागरीक,१५ व्या क्षत्रिय भावसार समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याच्या प्रसिद्धी प्रमुख मुक्ता शंकरराव पेटकर आणि महिला भगिणींची बहुसंख्येने उपस्थिती होती.तर या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !