हवामान तज्ञ पंजाबराव डख २४ जून रोजी भोकर येथे करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व संदिप पाटील गौड मित्रमंडळाच्या वतीने शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन सोहळ्याचे केले आहे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर व संदिप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने शनिवार,दि.२४ जून २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता,माऊली मंगल कार्यालय,किनवट रोड भोकर येथे तालुक्यातील काही शेतीनिष्ट शेतकरी व सुप्रसिद्ध हवामान तज्ञ तथा शेती विषयाचे गाढे अभ्यासक पंजाबराव डख पाटील यांचा सन्मान आणी शेतकरी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
“बदलत्या पाऊसमानाचा अंदाज व अनुरूप पिक पद्धतीचा अवलंब” या विषयावर हवामान यज्ञ पंजाबराव डख पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदरील सोहळ्यात काही शेतनिष्ठ शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान ही करण्यात येणार असून सदरील सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भोकर पंचायत समितीचे माजी सभापती गोंविद बाबागौड पाटील,शेतकरी तथा जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,भोकर तहसिल चे तहसिलदार राजेश लांडगे,नांदेड जि.प.चे माजी कृषि व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, भोकर बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,नांदेड जि.प.चे माजी कृषि व पशू संवर्धन सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,ओबीसी नेते नामदेव आयलवाड,प्रगतशील शेतकरी भगवान दंडवे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव आमृतवाड, सेवानिवृत्त तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख, कापुस पिक अभ्यासक मोहन देशमुख बारडकर, भोकर कृषि असोसिएशन चे अध्यक्ष उत्तम देशमुख बटाळकर,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,रा.पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.पाऊस लांबल्याने खरीप पेरण्या खोळबंल्या आहेत.पेरण्या उशिरा होत असल्याने शेतकरी बांधवांनी कोणती पिके घ्यावीत व पुढे पाऊसमान कसा राहील या विषयी हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालूका शाखा भोकर चे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व संदिप पाटील गौड मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी बांधवांनी केले आहे.