हर घर दस्तक -२ अभियान अंतर्गत भोकर शहरात कोविड लसीकरण
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : हर घर दस्तक -२ अभियान अंतर्गत भोकर शहरात शाशकीय ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार आणि ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या पर्यवेक्षण,नियोजनानुसार कोविड लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
दि.१ जून ते ३१ जुलै पर्यंत भोकर शहरात घरोघरी भेटी देऊन १८ वर्षे वयोगटावरील व्यक्तीनी कोविडचा पहिला, दुसरा,बुस्टर डोस व १२ ते १८ वर्षे वयोदरम्यान व्यक्तींची कोविडचा पहिला व दुसरा डोसचे लसीकरण झाले आहे का ? याची पाहणी व सर्वेक्षण करण्यात येत आहे.ज्या व्यक्तीचे वरील डोस झाले नाही त्यांना तिथेच कोविड लसीकरण करण्यात येत आहे.भोकर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की,आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना आपल्या कुटुंबातील कोविड लसीकरणाची माहिती दयावी.ज्या व्यक्तीने कोविड लसीकरण करून घेतले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे व संभाव्य कोविड साथीचा बचाव करावा,असे आवाहन डॉ.अशोक मुंडे,सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले आहे.
तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नियमित कोविड लसीकरण चालू आहे.
5आज दि.७ जून २०२२ रोजी शेख फरिदनगर,जिल्हा परीषद शाळेच्या पाठीमागील भागात हर घर दस्तक -२ अभियान राबविण्यात आले असून यात ८६ घरांना भेटी देऊन १६ व्यक्तींचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. तर या अभियानात आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे,आरोग्य सेविका श्रीमती सरस्वती दिवटे, संगीता पंदिलवाड यांचा समावेश होता.यावेळी अंगणवाडी सेविका श्रीमती कांताबाई चंद्रे,रमाबाई जाधव यांनी मदतनिस म्हणून सेवा बजावली.याचबरोबर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डाटा ऑपरेटर माया आडे यांनी ऑनलाईन नोंदणीचे काम पाहिले आहे.