हर घर तिरंगा उपक्रमात वर्ल्ड व्हिजनने दिले १ हजार तिरंगा ध्वज
व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे केले ते ध्वज सुपूर्द
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सबंध देशात ‘हर घर तिरंगा – घर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जात असून या उपक्रमात अनेक सेवाभावी व संंस्था लोक सहभाग देत आहेत.याच अनुशंगाने विविध क्षेत्रात सेवाभावी कार्य करत असलेली वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था ही सहभागी झालेली असून संस्थेच्या वतीने भोकर तालुक्यातील गावांसाठी १ हजार तिरंगा ध्वज संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी भोकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे क्रांतिदिनाच्या पुर्वसंध्येला सुपूर्द केले आहेत.

भारतीय स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान व योगदान दिले आहे.त्यांच्या बलिदान व योगदानाचे स्मरण व्हावे आणि आपल्या देशाप्रती राष्ट्रप्रेम, एकता दर्शविता यावी या उदात्त हेतून भारतीय स्वातंत्र्याच्या (७५ वर्ष) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सबंध देशात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून मानवंदना द्यावी यासाठी दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी दरम्यान ‘हर घर तिरंगा – घर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे.हा उपक्रम स्वयंस्फुर्तीने प्रत्येक नागरिकाने स्वतः तिरंगा खरेदी करुन व लोकसहभागातून राबविला जाणार आहे.हा उपक्रम देशप्रेम भावनेतून साजरा करावयाचा असला तरी अनेक गरिब व होतकरु नागरिक ध्वज खरेदी करु शकत नाहीत.अशा नागरिकांना ही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करुन घेता यावे यासाठी अनेक सेवाभावी व्यक्तीमत्वे व संस्था स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन या नागरिकांसाठी तिरंगा ध्वज देत आहेत.शासन प्रशासनाने तसे आवाहन ही केले आहे. याच अनुशंगाने त्या आवाहनास प्रतिसाद देत विविध क्षेत्रात सेवाभावी कार्य करत असलेली वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था सहभागी झाली आहे.या संस्थेच्या वतीने भोकर तालुक्यातील गावांसाठी १ हजार तिरंगा ध्वजांचा लोकसहभाग देण्यात आला असून संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी ‘क्रांतिदिनाच्या’ पुर्वसंध्येला भोकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे ते ध्वज सुपूर्द केले आहेत.यावेळी भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड,नायब तहसिलदार संजय सोलंकर,दमकोंडवार,भोकर नगर परिषदेचे कर्मचारी संजय कल्याणकर,वर्ल्ड व्हिजनचे रतिलाल वाळवी,जाधव, भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव,कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे,कमलाकर बरकमकर, विठ्ठल सुरलेकर,संदेश कांबळे,विशाल जाधव यांसह वर्ल्ड व्हिजन चे कर्मचारी व आदींची उपस्थिती होती.