Sun. Dec 22nd, 2024

स्वातंत्र्यवीरांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत-पो.नि. विकास पाटील

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापण व अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असल्याने देश स्वातंत्र्यासाठी बलिदान व योगदान देणा-या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेने विविध उपक्रम राष्ट्रीय राबविले जात आहेत.देश स्वातंत्र्यासाठी त्या स्वातंत्र्य सेनानींचा इतिहास सदैव प्रेरणादायी उर्जा देत असते.म्हणून यानिमित्ताने स्वातंत्र्यवीरांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत व देश सेवि करावी,असे प्रतिपादन भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी व्यक्त केले.भोकर येथील स्काॅलर्स इंग्लिश स्कुल ॲन्ड ज्युनियर काॅलेज यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला.तर दि.१५ ऑगसी २०२२ रोजी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन ही विविध उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याच अनुशंगाने ध्वजारोहणानंतर अनेक शाळांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व त्यातून विविध कलागुणांतून विद्यार्थ्यांनी देशभक्ती जागृत केली.स्वातंत्र्य सेनानींचे बलिदान,योगदान व प्रेरणादायी इतिहासाची उजळणी व्हावी या उद्देशाने स्काॅलर्स इंग्लिश स्कूल ॲन्ड ज्युनियर काॅलेज, भोकर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पो.नि.विकास पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,कार्याध्यक्ष शेख लतिफ भाई,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव,प्रा.आर.के.कदम,अन्य प्रतिनिधी पत्रकार गंगाधर पडवळे,सुधांशु कांबळे,कमलाकर बरकमकर,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,विशाल जाधव,गजानन गाडेकर, बोईवार यांसह आदींची उपस्थिती होती.

यावेळी सदरील शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनास अनुसरून विविध कलागुण सादर केली.तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वतंत्र्यवीरांची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकली.तर पुढे बोलतांना पो.नि.विकास पाटील म्हणाले की,प्रत्येकाच्या आईवडिलांची इच्छा असते की,माझा मुलगा,मुलगी यांनी खुप शिकावं, शिकून मोठे व्हावे.आई,वडील,गाव,राज्य व देशाचं नाव मोठं करावं.परंतू हे करण्यासाठी व होण्यासाठी शिक्षणासोबत प्रेरणादायी विचार आत्मसात करणे ही गरजेचे असते.असे करणारे विद्यार्थी यशस्वी होतात व आपल्या आई वडीलांसह अन्य अपेक्षित स्वप्ने ही पुर्ण होतात आणि हे होण्यासाठी या दिनी मी सर्व विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा देतो.असे ते म्हणाले.सदरील.सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यार्थी,पालक, गुरुजन यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.तर सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक म.ईलीयास, रेहान सरवरी,ईरफान सरवरी,म.सुजाओद्दीन यांच्यासह आदी शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !