स्था.गु.शा.पोलीसांनी भोकरमध्ये पकडला १९ हजाराचा अवैध गुटखा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : गोपनीय माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीसांनी दि.२९ सप्टेंबर रोजी भोकर येथील एका गोळी बिस्कीट विक्रीच्या दुकानातून राज्यात प्रतिबंधित असलेला विविध कंपनीचा जवळपास १८ हजार ८५९ रुपये किमतीचा अवैध गुटखा पकडला असून दुकान मालका विरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर शहरातील काही गोळी बिस्कीट विक्रीच्या दुकानांतून राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीसांना मिळाल्यावरुन पो.उप. नि.परमेश्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वातील स्था.गु.शा.नांदेड पोलीसांच्या पथकाने दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान भोकर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील गोळी बिस्कीट विक्री च्या दुकानात छापा टाकून तपासणी केली असता तेथे आर.के.,सितार,जोकर,ए.ए.ए.,मुसाफीर,विमल व सागर नावाच्या विविध कंपनीचे आणि राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलजलेल्या अवैध गुटख्याची जवळपास १८ हजार ८५९ रुपये किमतीचे पुडे नायलॉन पोत्यात ठेवलेले मिळाले.
सदरील गोळी बिस्कीट विक्री दुकानच्या मालकाने अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने उत्पादन,विक्री,वितरण व वाहतुक करीता प्रतिबंध केलेला अवैध गुटखा मानवी आरोग्यास अति घातक असून त्यामुळे कॅन्सर सारखे दुर्धर आजार होवुन मानवाचा मुत्यु होतो.हे त्यास माहित असतांनाही स्वत: च्या आर्थिक लोभा पोटी जाणीव पुर्वक विक्रीसाठी ठेवल्याचे मिळून आला.सदरील प्रतिबंधित गुटखा हा मानवी सेवनास अतिधातक व मुत्यूस कारणीभूत असतांनाही तो विक्रीसाठी ठेवला असल्याने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे त्याने उलंघन केले आहे.अशा आशयाच्या मजकूराची फिर्याद स्था.गु.शा.नांदेड पोलीस पथकातील पो.उप.नि.परमेश्वर ठाणुसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिल्या वरुन गुरन. ३७२/२०२२ कलम १८८,२७२,२७३,३२८,सह कलम २६(२),२७,२३, ३०(२),(अ) व कलम ५९(iv) अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ अन्वये दुकान मालक शेख फहीम पिता शेख मन्नान (२४) रा.सईद नगर,भोकर ता.भोकर जि.नांदेड याच्या विरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अनिल कांबळे हे करत आहेत.