सेवा पंधरवडा-हाळदा येथील आरोग्य शिबिरात झाली ४५० जणांची तपासणी
तर आमदार राम पाटील रातोळीकर यानी स्मशानभूमी विकासाठी १० लक्ष रुपये आणि सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी शाळेच्या खोलीसाठी ५ लक्ष रुपये निधी केला जाहीर
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर :भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि.१७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांचा जयंती दिन दि.२ ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. दरम्मानच्या काळात विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत.याच औचित्याने भाजपा तालुका भोकर व हळदा ता.भोकर शाखेच्या वतीने हाळदा येथे दि.३० सप्टेंबर रोजी भव्य मोपत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात हाळदा व परिसरातील आदी गावांच्या गरजू महिला व पुरुषांनी आपली आरोग्य तपासणी करुन घेतली. अशा ४५० रुग्णाची तपासणी तालुक्यातील अनेक तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या तपासणीत सदरील शिबिरात जवळपास ४५० रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला आहे.तर याप्रसंगी आमदार राम पाटील रातोळीकर यानी हळदा येथील स्मशानभूमी विकासाठी १० लक्ष रुपये आणि सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी शाळेच्या खोलीसाठी ५ लक्ष रुपये निधी जाहीर केला आहे.
सदरील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन भाजपा महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्ष म्हणून आमदार राम पाटील रातोळीकर यांची उपस्थिती होती.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,माजी जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी,जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा कोंडलवार,तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर,गणपतराव पिटेवाड,महिला तालुकध्यक्षा विजयाताई घिस्सेवाड,हरिभाऊ चटलावार,सुनिल शाह,सरपंच सौ.सुमनबाई नागमोड यांसह आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
यावेळी शिबिराच्या उद्घाटन पर मनोगतात किशोर देशमुख, प्रणिताताई देवरे व आमदार राम पाटील रातोळीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तुंग जीवन कार्याचा आढावा घेत ‘जनसामान्याची काळजी घेणारा महापुरुष’ असे गौरवोद्गार व्यक्त केले.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण भागातील अंतोदयाखालील महिला व पुरुष यांच्या सुखी व संपन्न जीवनाची काळजी पक्ष कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने गावागावात आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे यासारखे समाजोपयोगी उपक्रम घेऊन गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा उपक्रम पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे,असे त्यांनी म्हटले आहे.विशेषतः नवरात्राचे दिवस असल्याने महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत,अशी माहिती ही दिली.
या शिबिरात हायड्रोसिल,हर्निया,अपेंडिक्स,बीपी,सुगर,एचबी,कर्करोग, दंत तशेच महिलांची संपूर्ण आरोग्याची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आली.याच बरोबर आवश्यक असलेल्या गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शासकीय ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या आरोग्य शिबिरात ग्रामीण रुग्णालय भोकरचे अधीक्षक डॉ.अशोक मुंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.लालू बोर्डे, डॉ.निलावार,भूलतज्ञ डॉ.रामेश्वर भाले,महिला तज्ञ डॉ.सौ. मनीषा भाले,बालरोग तज्ञ डॉ.गजानन धरमुरे,डॉ.सागर रेड्डी, डॉ.राम नाईक,डॉ.दामणवाड यांसह आदी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून पुढील उपचारार्थचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे आयोजक भाजपा सरचिटणीस चंद्रकांत नागमोडे यांनी केले तर आभार माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिक्षिका एस.आर.मंडलापुरे यांनी केले. या शिबिराचा हाळदा,लामकानी,हाडोळी,रायखोड,धारजणी आदी गावातील गरजू रुग्णांनी लाभ घेतला.हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील आजी माजी सरपंच,उपसरपंच,चेअरमन,तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व प्रतिष्ठित नागरिकांनी मोलाचे परिश्रम घेतले.
आ.राम पाटील रातोळीकर यानी स्मशानभूमी विकासाठी १० लक्ष रुपये आणि सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी शाळेच्या खोलीसाठी ५ लक्ष रुपये निधी केला जाहीर
सेवा पंधरवाडा निमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण याच्या मतदार संघातील हळदा ता.भोकर येथे विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी स्मशानभूमी विकासासाठी १० लक्ष रुपये,तर खासदार निधीतून सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी शाळा खोलीसाठी ५ लक्ष रुपये निधी जाहीर केला.आ.अशोक चव्हाण यांनी या मतदार संघात विकासात्मक कामांसाठी कोट्यावधीचा विकास निधी दिलेला आहे. परंतू त्यांच्या मतदार संघात विधान परिषद आमदारांनी क्वचितच निधी दिल्याचे उदाहरणे असतांना भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर व सौ.प्रणिताताई देवरे यांनी भोकर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या वतीने १५ लाखाचा विकास निधी देऊन खारीच्या वाट्याने अशा प्रकारे सेवा पंधरवाडा साजरा केला आहे,असे चर्चील्या जात असून हळदा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे.