साहित्यिक छाया बेले यांना ‘उलगुलान’ काव्य पुरस्कार जाहीर

२४ डिसेंबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या ६ व्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात उपरोक्त पुरस्काराने त्यांना करण्यात येणार आहे सन्मानित!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : येथील प्रथितयश लेखिका व कवयित्री छाया बेले यांच्या ‘हॅपी होम च्या भिंतीआड’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाला अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कवि भुजंग मेश्राम यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘उलगुलान’ काव्य पुरस्कार जाहीर झाला असून दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी नांदेड येथे होणाऱ्या ६ व्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपरोक्त पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे,अशी माहिती अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे महासचिव प्रा.संजय मांजरमकर यांनी दिली आहे.
‘हॅपी होमच्या भिंती आड’ हा स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा त्यांचा काव्य संग्रह अहमदनगर येथील साहित्याक्षर या नामांकित प्रकाशनाने(१४ जुलै २०२३) प्रकाशित केला असून यापुर्वी त्यांचे ‘लढाई अस्तित्वाची’ (१ जुलै २०१२) व ‘घर याचे हृदयी माझ्या’ (१ जानेवारी २०१८) हे काव्यसंग्रह, ‘फरफट’ ही कादंबरी व ‘चकवा’, ‘वैशाख वणवा ‘हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.तर अस्मितादर्श,अक्षरगाथा,अक्षरगणगोत, साहित्य समन्वय,परिवर्तनाचा वाटसरू,दै.एककमत,दै.यशवंत, रानफूल (दिवाळी अंक),सायबर क्राईम (साप्ताहिक),अंबुज प्रहार न्युज लाईव्ह दिवाळी विशेषांक -२०२३ यांसह इत्यादी विशेषांकातून कथा,कविता,लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणी नांदेड,परभणी वरून काव्यवाचन आणि अनेक साहित्य संमेलनातून निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे.याच बरोबर ६ व्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात त्या काव्य मैफिल सत्राच्या त्या अध्यक्षा आहेत.
त्यांच्या साहित्य संपदेची दखल झाल्याने मुक्तासाळवे सार्वजनिक वाचनालय,उदगीर जि.लातूर चा उत्कृष्ट वाड़मय निर्मिती पुरस्कार-२०१३(राज्य स्तरीय),डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार-२०१४ (राज्य स्तरीय),अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद नांदेडचा गुरु रविदास साहित्य पुरस्कार-२०१५ (राज्य स्तरीय),अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद,नांदेड महाराष्ट्र राज्य चा क्रांतीगुरू लहुजी साळवे पुरस्कार- २०१५(राज्य स्तरीय),श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंधा,ता.लोणार,जि. जालना चा आद्य क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी साळवे साहित्य साधना पुरस्कार-२०१८(राज्य स्तरीय),अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद पुणे,महाराष्ट्र राज्य चा विद्रोही कवयित्री पुरस्कार-२०१९(राज्य स्तरीय),डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार-२०१९ (लातूर), तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नर चार वैशाख वणवा या कथासंग्रहास सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार- २०१९(राज्य स्तरीय) व फरफट या कादंबरीस सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अध्यासनचा राज्यस्तरीय वाड़मय पुरस्कार-२०२२ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
तर येत्या दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी नांदेड येथे होणार असलेल्या ६ व्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात कवयित्री छाया बेले यांना ‘उलगुलान’ काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,या प्रतिष्ठित पुरस्काराने साहित्यिक छाया बेले यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून संपादक उत्तम बाबळे व परिवाराच्या वतीने देखील या प्रतिभावंत साहित्यिकेचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशासाठी अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!