सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व ॲड.राणीपद्मावती बंडेवार
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी १५ ऑगस्ट दिनी आमच्या भगिणी राणीपद्मावती बंडेवार होत आहेत कै.कुसूमताई चव्हाण विशेष महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित…
उत्तम बाबळे,संपादक
मस्की ता.लोहा,जि.नांदेड या छोट्याश्या गावचे रहिवासी परमेश्वर माणिकराव बंडेवार हे शिव-लहु-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ यांच्या विचारांचे वारसदार तथा दलित,वंचित,उपेक्षित,शोषित वर्गाच्या अन्याय अत्याचारविरुद्ध लढणारे सामाजिक चलवळीतील एक सच्चे समाजसेवी व्यक्तीमत्व व अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या कु.राणीपद्मावती या जिज्ञासू व कर्तुत्ववान लेकीचा उद्या स्वातंत्र्यदिनी नांदेड येथे कै. कुसूमताई चव्हाण विशेष महिला सन्मान पुरस्काराने सन्मान होणार आहे.त्या औचित्याने…
अत्यंत हुशार,चाणक्ष,चिकित्सक अभ्यासूवृत्ती असलेल्या राणीपद्मावतीस सामाजिक कार्यकर्ते असलेल्या वडीलांकडून समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे.वडीलांचे सामाजिक कार्य पाहून तिनेही सामाजिक कार्यात येण्याची ईच्छा व्यक्त केली आणि इयत्ता बारावी नंतर समाजकार्य पदवी बीएसडब्लू(BSW)ला प्रवेश घेण्यासाठी वडिलांकडे आग्रह धरला.प्रवेश घेतला व बीएसडब्लू उत्तीर्ण होऊन एमएसडब्लू(MSW) मध्ये देखील यश संपादन केले. शिक्षण करत असतांना गाव खेड्याती स्त्री,दलित, वंचित,शोषित,पिडीतांच्या प्रश्नांना आपल्या व्याख्यानातून व कर्तव्यातून वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने त्या करत राहिल्या.
एमएसडब्लू(MSW) चे पदवीत्तर शिक्षण घेऊन त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )मध्ये समतादूत म्हणून रुजू झाल्या आणि त्यांना समाजसेवेची नामी संधी मिळाली.याच माध्यमातून गावागावात महापुरुषांच्या विचारांची पेरणी करने,दलित, उपेक्षित महिला व तरुणाईतल्या मुला मुलींना आपल्या हक्क,अधिकारांची जाणीव करून देने,उद्योगाकडे वळवण्यासासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करने, उद्योग प्रशिक्षण संस्थे मार्फत व्यवसाय प्रशिक्षण करून देणे,महिलांचे बचगट तयार करून मार्गदर्शन करणे आणि जिल्हा समाजाकल्याण कार्यालय,बँक यांना संलग्न करून देणे.त्याच बरोबर आरटईई(RTE)अंतर्गत सरकारी,निमसरकारी, नामांकित शिक्षण संस्थामध्ये गरीब पाल्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देणे.अशी समाजसेवी कामे त्या अनेक वर्षापासून सातत्याने करीत आहेत. शिव-लहु-फुले-शाहू-आंबेडकर- अण्णा भाऊ यांच्या विचाराचा वारसा घेऊन मार्गक्रमन करीत ॲड. राणीपद्मावती बंडेवार यांनी परिस्थितीचा बाऊ न करता पुढे एल.एल.बी.,एल.एल.एम.,(LLB,LLM) ह्या शैक्षणिक पदव्या संपादन वकील होऊन न्याय क्षेत्रात पदार्पण केले आहे.त्याच बरोबर त्यांनी ऑल इंडिया बार कॉनसिल(AIB -ALL INDIA BAR COUNCIL)ही परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. विशेष बाब म्हणजे इयत्ता पहिली ते बारावी व संपूर्ण शिक्षण कधीही नापास न होता पूर्ण केले आहे.सध्या त्या बार्टी या संस्थेच्या समतादूत म्हणून कार्यरत आहेत.
शासनाची समता रथ रॅली,समाज प्रबोधन रॅली,सर्व प्रकारचे राष्ट्रीय कामे,राष्ट्रीय उत्सव,यासह आदी उपक्रम व कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याची त्यांची धडपड असते. महापुरुषांचे साहित्य लेखन करणे,चांगल्या पुस्तकांचे वाचन व मनन करणे ही त्यांची वैचारिक आवड आहे व याच वैचारिकतेमुळे अन्याय अत्याचारविरुद्ध लढणे हा त्यांचा पिंड आहे, यांची जाणीव वेळोवेळी आम्हास होते.यांच्या या सामाजिक कामाची दखल घेऊन अनेक सेवाभावी,समाजसेवी संस्थानी त्यांना अनेक पुरस्कारांनी आतापर्यंत सन्मानित केले आहे.त्यात सामाजिक कार्यरत्न पुरस्कार,स्त्रिरत्न पुरस्कार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार अशा आदी पुरस्कारांचा समावेश असून आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी १५ ऑगस्ट २०२३ रोजी एका नुतन पुरस्कारांची भर पडणार आहे.तो म्हणजे ‘कै.कुसूमताई चव्हाण विशेष महिला सन्मान पुरस्कार’…
एका सामान्य कुटूंबातील असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या सन्मानार्थी कु.राणीपद्मावती बंडेवार यांचे अगदी मनापासून खुप खुप हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक,शैक्षणिक,न्यायीक,शासकीय व निमशासकीय सेवाकर्यास हार्दिक शुभेच्छा !
-: शुभेच्छूक :-
मा.सतिशजी कानडे
संस्थापक अध्यक्ष- अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य आणि समस्त पदाधिकारी