सामाजिक नेते सतिश कावडे व संपादक पंडित हणमंते ‘समाज भुषण’ पुरस्काराने सन्मानित
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ,नांदेडच्या वतीने देण्यात आला हा पुरस्कार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : सामाजिक,शैक्षणिक व आदी क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य केल्याची दखल घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळ,नांदेड च्या वतीने दि.१ ऑगस्ट रोजी नांदेड येथे संपन्न झालेल्या भव्य अभिवादन व सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक नेते सतिश कावडे आणि संपादक पंडित हणमंते यांसह अन्य दोघांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ‘समाज भुषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या सर्व पुरस्कारार्थींचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळ,नांदेडच्या वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्याचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.यांनतर दुपारी पुतळा परिसरात अभिवादन सभा व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सकल मातंग समाज समन्वयक तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारोती वाडेकर हे होते.तर उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम व स्वागताध्यक्ष म्हणून नांदेड महापालिकेचे माजी नगरसेवक अशोक भाऊ उमरेकर यांची उपस्थिती होती.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे,एम.आर.पी.एस.चे नेते यादव सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर यांसह आदींची उपस्थिती होती.तर प्रमुख वक्ते म्हणून कॉ.अशोक घायाळे यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी लोकप्रिय दैनिक साहित्य सम्राट च्या ‘बहुजन नायक’ या जयंती विशेषांकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ही करण्यात आले.
शासकीय नौकरीत असतांना व सेवानिवृत्त झाल्यावरही ज्यांनी शोषित,वंचित,पिडीत,दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक व विविध क्षेत्रात अविरत काम केले आहे.तसेच अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय लढा सुरुच ठेवला आहे ते जेष्ठ सामाजिक नेते तथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे,वर्तमानपत्र व पत्रकारितेतून अन्याय अत्याचारा विरुद्ध आपली लेखणी झिजवून आणि मांस या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत श्रमशिल असलेले मांस संघटनेचे संस्थापक सचिव तथा दैनिक साहित्य सम्राट चे मुख्य संपादक पंडित हणमंते याच बरोबर जेष्ठ सामाजिक नेते संपादक स्व.आय पी.बसवंते यांच्या पत्नी श्रीमती जिजाबाई व सामाजिक नेते विठ्ठल बोरीकर यांचे सामाजिक कार्य,योगदानाची जयंती मंडळाने दखल घेऊन संपन्न झालेल्या या अभिवादन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ‘समाज भुषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याच बरोबर सामाजिक क्षेत्रात भरीव काम व योगदान असलेले माजी सनदी अधिकारी व्हि.जे.वरवंटकर,नांदेड महापालिकेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजि सुग्रीव अंधारे,दलितमित्र चंद्रकांत घोडजकर,नांदेड, ओबीसी नेते बालाजी इबितदार,पिपल्स कॉलेज नांदेडचे प्रा.डॉ.सी.के.हरनावळे,माजी जि.प.सदस्य संग्राम सुर्यवंशी,एल.एम.शेवाळकर,शाहीर व्यंकट इगेवार यांसह आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
संपन्न झालेल्या सोहळ्याचे प्रस्ताविक गणेश तादलापुरकर व दै.साहित्य सम्राट चे कार्यकारी संपादक सुर्यकांत तादलापुरकर यानी केले.तर आमदार मोहन अण्णा हंबर्डे,डॉ.सुनिल कदम, पंडित हणमंते,सतिश कावडे,यादव सुर्यवंशी, बालाजी इबितदार यांसह आदींनी सोहळ्यास अनुसरून मनोगत व्यक्त केले.तसेच अध्यक्षीय समारोप मारोती वाडेकर यानी केला.सुरेख असे सुत्रसंचालन दयानंद बसवंते यानी केले,तर उपस्थितांचे आभार भारत सरोदे यांनी मानले.
अभिवादन सभेपुर्वी शाहीर विनोद गवाले, विश्वनाथ भालेराव संच आणि सप्तरंगी कलामंच, मुंबई यांचा प्रबोधनात्मक शाहिरीचा कार्यक्रम पार पडला.नांदेड शहरात भव्य दिव्य अशी जयंती, अभिवादन व सत्कार सोहळा संपन्न झाला.या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष अशोक भाऊ उमरेकर,जयंती मंडळाचे अध्यक्ष निलेश तादलापुरकर,सचिव इश्वर अण्णा जाधव,उपाध्यक्ष नवनाथ वाकोडे,कोषाध्यक्ष बालासाहेब वाघमारे, सह सचिव रोहन वाघमारे, कार्याध्यक्ष संजय गायकवाड,संघटक स्वप्निल फुले, सल्लागार गणेश तादलापुरकर,भारत सरोदे,सुर्यकांत तादलापुरकर, दयानंद बसवंते,प्रविण खोबरे,राहुल तेलंग,भगवान जाधव,सचिन वाघमारे,शिवाजीराव नुरूंदे,भारत खडसे, संजय गोटमुखे,प्रितम गवाले,सुनिल मोघेकर,आकाश गवाले,राहुल खंडेलोटे,अनंत कुमार,चिंदटू तेलंग,सोनु वाघमारे,सतिश सुगावकर,साईनाथ जाधव यांसह आदींनी अथक परिश्रम घेतले.