Mon. Dec 23rd, 2024

सशक्त पिढी घडविण्यासाठी ‘सुरक्षित माता व सुदृढ बालक’ असणे गरजेचे- राजेश लांडगे

Spread the love

भोकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ‘जागरूक पालक,सुदृढ बालक अभियानाचा’ करण्यात आला शुभारंभ

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : निरोगी व सुरक्षित असलेली माता आपल्या पाल्यांना योग्य आहार देऊन निरोगी आणि सुदृढ ठेऊ शकते,तसेच प्रत्येक ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित राहू शकते.म्हणून सशक्त पिढी घडविण्यासाठी ‘सुरक्षित माता व सुदृढ बालक’ असणे गरजेचे असते.असे प्रतिपादन भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.९ फेब्रुवारी रोजी भोकर येथे संपन्न झालेल्या ‘जागरूक पालक,सुदृढ बालक अभियानाच्या’ शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही महिलांच्या आरोग्य तपासणीची राज्यव्यापी मोहीम नुकतीच राबविण्यात आली.यात जवळपास ४ कोटी महिलांच्या आरोग्याची सर्वांगिण तपासणी करण्यात आली होती.तसेच ज्या महिलांना वेगवेगळ्या आजारांसाठी पुढील उपचाराची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नवीन योजना आरोग्य विभागाने हाती घेतल्या आहेत.तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आता राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुला मुलींची राज्यव्यापी तपासणी मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.

याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यात व भोकर येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून जिल्हा परिषद हायस्कूल, किनवट रोड भोकर येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानाच्या’ भोकर येथील शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार राजेश लांडगे हे होते.तर गटविकास अधिकारी अमित राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांसह आदींची प्रमुख पाहुणे उपस्थिती होती.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत चव्हाण यांनी प्रास्ताविकातून व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांनी मनोगतातून सदरील अभियानाविषयीची सविस्तर माहिती विषद केली.तर अध्यक्षिय समारोपात तहसिलदार राजेश लांडगे पुढे म्हणाले की,राज्य शासनाने माता,बालक व किशोरवयीन मुला मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक उपक्रम आणि अभियान सुरु केले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून ‘जागरूक पालक,सुदृढ बालक अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत भोकर शहर व तालुक्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील बालके व  किशोरवयीन मुला मुलींची सर्वांगीण तपासणी करण्यात येणार आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल भोकरचे मुख्याध्यापक पी.एल.खोकले,सहशिक्षक अविनाश रेड्डी,रामदास पुणेबोईनवाड,संजय खांडरे,तालुका समन्वयक जगदीश थडवे,अंगणवाडी पर्यवेक्षिका रेणूका कॅरमकोंडा,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ.व्यंकटेश टाकळकर,डॉ.अविनाश गुंडाळे,डॉ.अपर्णा जोशी,डॉ.ज्योती यन्नावार,आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार,एम.ए.सय्यद,औषध निर्माण अधिकारी गिरी रावलोड,आरोग्य कर्मचारी पांडुरंग तमलवाड,आरोग्य सेविका स्वाती सुवर्णकार,गजानन तमलवाड,सुधाकर जाधव आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !