सर्वांचे सहकार्य मिळाल्यानेच भोकरचे शैक्षणिक क्षेत्र नंबर एकवर नेता आले-डॉ.मठपती
वक्तृत्व,कर्तृत्व आणी नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ.मठपती -केंद्रपमुख शेख
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करतांना माझ्या कार्यकाळात तालुक्यातील सर्व शिक्षक,कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी व पालक यांसह सर्वांचे सहकार्य मला मिळाले,त्यामुळेच भोकर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्र मला नंबर एकवर नेता आले.असे मनोगत लातूर येथे पदोन्नतीवर गेलेले शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांनी भोकर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा व निरोप समारंभ प्रसंगी दि.११ मार्च रोजी व्यक्त केले.
भोकर तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी गेली अडीच वर्षे तन,मण व धनाने स्वतःला झोकून देऊन ध्येय गाठण्यासाठी कर्तव्य बजावणारे भोकर पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षणप्रिय गटशिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय मठपती यांची नुकतीच पदोन्नती होऊन लातूर येथे शिक्षण उपसंचालक पदी त्यांची नियुक्ती झाली.त्यानिमित्ताने गटशिक्षणाधिकारी कार्यालय, भोकरच्या वतीने त्यांचा सन्मान व निरोप समारंभ सोहळा दि.११ मार्च २०२२ रोजी भोकर येथे आयोजीत करण्यात आला होता.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी गटशिक्षणाधिकारी वाघमारे,मुधोळकर,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शिरसाठ,सुप्पे आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात विषय शिक्षक सुधांशू कांबळे यांनी आयोजित सोहळ्याची पार्श्वभूमी विषध केली.तर या प्रसंगी सत्कार मुर्ती भोकरचे माजी गटशिक्षणाधिकारी तथा लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ.दत्तात्रय मठपती यांच्या विषयी केंद्र प्रमुख शेख म्हणाले की,वक्तृत्व,कर्तृत्व व नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ.दत्तात्रय मठपती हे होत.तसेच भोकरचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी तथा माहूरचे विद्यमान गटशिक्षणाधिकारी मुधोळकर हे म्हणाले की,”Times study and working on mission mode that is the name of Dr.D.S.Mathpati sir!”, तर बहुतांश जणांनी डॉ.दत्तात्रय मठपती हे वरुन फणसासारखे टणक,परंतू आतून गोड,शिस्तप्रिय, मनमिळावू व अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत अशा भावना व्यक्त केल्या.
तर या सत्कार समारंभाला उत्तर देतांना सत्कार मूर्ती डॉ.दत्तात्रय मठपती म्हणाले की,भोकर तालुक्यातील शैक्षणीक दर्जा उंचावण्यासाठीचे कर्तव्य पार पाडने हे माझ्या सारख्या एकट्या व्यक्तीकडून शक्य झाले नसते,त्यात सर्वच सहकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून माझ्या बोलण्याला मनावर घेऊन कार्यशैलीत सुधारणा करून घेत परिश्रम घेतल्यानेच हे सर्व काही शक्य झाले आहे.कोरोना प्रादुर्भाव काळातील कठीण समयी योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर सर्वांनी केला.त्याच नियोजनबद्ध कार्याच्या बळावर शिष्यवृत्ती,नवोदय व विविध स्पर्धा परीक्षेत ही मरगळलेला भोकर तालुका अव्वलस्थानी नेता आला.याच बरोबर अधिकारी,शिक्षक,कर्मचारी यांच्या समस्या, अडचणी, सोडवित आणि मतभेद दूर केल्यानेच भोकर तालुक्यातील शिक्षण विभागात एक नवचैतन्य निर्माण करता आले.येथील प्रत्येक कर्मचारी,अधिकारी यांनी माझ्या आदेशाचे पालन केले मला जीव लावला.त्यातील एक अविस्मरणीय आठवण म्हणजे विषय शिक्षक सुधांशू कांबळे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्ताने ३०० वृक्ष रोपट्यांची लागवड करून मला जन्मदिवसाची आगळी वेगळी भेट दिली.ती माझ्यासाठी अनमोल असून प्रत्येक वाढदिवशी स्मरणात राहील,असे ही ते म्हणाले.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या हर्वांनी डॉ. दत्तात्रय मठपती यांचा सहपत्नीक सह्रदय सत्कार केला व उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती व्हावी आणि पुढे ते लवकरच राज्याचे शिक्षण संचालक व्हावेत अशा मनोभावे शुभेच्छा दिल्या.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाततील सर्व कर्मचारी यांसह आदींनी परिश्रम घेतले.या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन शिक्षक जोंधळे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार शिक्षक लक्ष्मण सुरकार सर यांनी मानले.