समाजसेवक स्व.राजाराम काकाणी यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न
धर्माबाद येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील मान्यवरांची उपस्थिती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
धर्माबाद : नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे जेष्ठ समाजसेवक यांच्या समाजसेवी कार्याची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून धर्माबाद येथे त्यांनी स्थापन केलेल्या शाळेत समाजसेवक स्व.राजाराम काकाणी यांचा पुतळा उभारण्यात आला.या पतळ्याचे दि.४ जून रोजी मोठ्या उत्साही सोहळ्यात बुलढाणा अर्बन बँकेचे चेअरमन राधेश्याम चांडक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार,नांदेड जिल्हाधिकारी विपीन इटनकर,यांसह तेलंगणा राज्याचे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.तेलंगणा राज्याच्या सिमेवरील महाराष्ट्रातील धर्माबाद शहराच्या विकासात स्व.राजाराम काकाणी यांचे मोठे योगदान आहे.त्यामुळे स्व.काकाणी यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर,महिला, पुरुषांची मोठी गर्दी झाली होती.या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासोबतच श्री गणेश,सरस्वतीमाता आणि श्री राधाकृष्णाच्या जोडीच्या मूर्तीची देखील पुतळ्या शेजारी स्थापना करण्यात आली आहे.याप्रसंगी धर्माबाद शहरातील नागरिकांना हा पुळका सेवाभावाची सदैव प्रेरणा देत राहील असे भावोद्गार उपस्थितांतून निघत होते.